DNA मराठी

Maharashtra

amol kolhe

Amol Kolhe : अमोल कोल्हे सोडणार शरद पवारांनी साथ? ऑपरेशन तुतारी’वर स्पष्टीकरण देत म्हणाले…

Amol Kolhe : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ऑपरेशन तुतारी अंतर्गत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पक्षाची साथ सोडणार असून एनडीएला लोकसभेत समर्थन देणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत ऑफर आली तर विचार करू असं विधान केल्याने अमोल कोल्हे पक्षाची साथ सोडणार आल्याचे सांगितलं जात होतं मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठाम असल्याचे स्पष्ट केले. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “ऑफर आली तर विचार करू” असे म्हटले होते. हे विधान केवळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते, राजकीय प्रवेशाशी त्याचा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठाही व्यक्त केली. “पवार साहेब सांगतील तेच आमचे धोरण आणि ते बांधतील तेच तोरण,” असे म्हणत पक्षातील सर्व खासदार एकत्र असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, आपण कुठेही जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चा फेटाळून लावत सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाच्या खासदारांना विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Amol Kolhe : अमोल कोल्हे सोडणार शरद पवारांनी साथ? ऑपरेशन तुतारी’वर स्पष्टीकरण देत म्हणाले… Read More »

hardik pandya

Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK साठी खेळणार? चेन्नईने स्पष्ट सांगितलं

Hardik Pandya : आयपीएल 2027 ची आतापासूनच संघ मालकांनी तयारी सुरू केली असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपल्या संघाची ताकद वाढवण्यासाठी संघ मालक सध्या प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) जाणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या सीएसकेमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने या सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी यावर भाष्य करत पांड्याबाबत कोणतीही ट्रेड चर्चा झालेली नसल्याची माहिती दिली आहे. 2027 मध्ये मुंबईकडून हार्दिक पांड्या खेळणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याने अनेक फ्रँचायझींनी त्याच्याविषयी स्वारस्य दाखवल्याच्या बातम्या समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची नावे संभाव्य दावेदारांमध्ये घेतली जात आहे मात्र आता चेन्नई सुपर किंग्सने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचा हंगामोत्तर आढावा अद्याप झालेला नसून, मेजर लीग क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतरच खेळाडूंबाबत निर्णय घेतले जातील. त्यामुळे सध्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याची माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनेही सध्या कोणत्याही खेळाडूच्या ट्रेडसंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. संघाचा हंगामाचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असे फ्रँचायझीकडून सांगण्यात आले. यामुळे हार्दिक चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला असून, आगामी आयपीएल ट्रेड विंडोमध्येच त्याच्या भवितव्याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK साठी खेळणार? चेन्नईने स्पष्ट सांगितलं Read More »

rain

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा Read More »

sex racket

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Girgaon High Profile sex Racket : गिरगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात सिनेसृष्टीशी संबंधित एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मेकअप आर्टिस्टने चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ग्राहकांशी जोडण्याचे काम केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. तपासादरम्यान दोन महिलांसाठी एकूण दोन लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने या व्यवहारातून कमिशन घेऊन महिलांना संबंधित हॉटेलमध्ये आणल्याचा पोलिसांचा दावा आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांनी कोणत्याही महिलेची ओळख जाहीर केलेली नाही. तपासादरम्यान आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत महिलांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर दलाल किंवा संबंधित व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा Read More »

img 20260630 wa0003

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला. आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. २९ जून रोजी समृद्धी महामार्गावर नियोजित जनआंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. पावसाळी परिस्थिती, स्थानिक प्रशासनावरील वाढलेला ताण तसेच आगामी कुंभमेळ्याच्या तयारीची कामे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी लढा थांबलेला नसून केवळ पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहभागातून संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण आणि परिसरातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ९ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “हा संघर्ष केवळ नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठी नाही, तर संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या हक्कांसाठी आहे. क्रांती दिनाच्या साक्षीने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लढ्याला बळ द्यावे,” असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. पुढील २–३ दिवसांत संयुक्त बैठक नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी जनआंदोलन करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, त्याबाबत सर्व संबंधितांची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढील २–३ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप, नियोजन आणि पुढील कृती आराखड्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे Read More »

Sharad Pawar

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अंतर्गत पातळीवर दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. माहितीनुसार, काही पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करत आहे तर काही नेते सत्ताधारी एनडीएत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि निधी मिळवताना अडचणी येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याबाबत पक्षात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होत असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचाही पर्याय विचारात घेतला जावा. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आमदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, भविष्यात पक्षाची राजकीय दिशा काय असेल आणि या मतभेदांवर शरद पवार कोणता निर्णय घेतील, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींबाबत विविध सूत्रांच्या आधारे चर्चा सुरू असून संबंधित पक्षाकडून अंतिम अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार Read More »

Accident Photo

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर

Nilesh Lanke: अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे स्पष्ट केले. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो, असे सांगताना भोर म्हणाले की, सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितले खासदार निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक पक्षात आले तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू खासदार निलेश लंके यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडलेले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना भोर म्हणाले, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर Read More »