DNA मराठी

Maharashtra

tukaram munde

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

Tukaram Munde: अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे.

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित Read More »

amol khatal

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच

Amol Khatal : संगमनेर मध्ये प्रस्थापित बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून जॉईन केलं ठरलेले अमोल खताळ व थोरात यांचे भाचे असलेले आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये विकास कामावरून रस्सीखेच नेहमीच पाहायला मिळते यातच आता पुन्हा एका कामावरून श्रेयवादाची लढाई दोन्ही आमदारांमध्ये सोशल मीडिया वरती पाहायला मिळते. याला कारण म्हणजे लवकरच संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार हे आहे वादाचे कारण… मात्र या कार्यालयासाठी खरा पुढाकार कोणाचा? जे 40 वर्षे झाले नाही ते दीड वर्षात होणार संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन सेवा संदर्भात वर्षानुवर्षेपासून होणारी गैर्यत दूर व्हावी आणि आरटीओचे संबंधित कामे स्थानिक पातळीवरच व्हावी त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व अखेर या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आले यामुळे लवकरच संगमनेर मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साकारणार आहे अशी माहिती अमोल खताळ यांनी आपल्या सोशल मीडिया वरती दिली. तर याबाबत अमोल खताळ यांनी 23 जानेवारी 2025 पासून मंत्री सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानंतर 2025 या वर्षात 20 फेब्रुवारी 21 मार्च 24 मार्च 5 जून तसेच 25 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत याबाबत खतांनी पाठपुरावा केला त्यानंतर अखेर एक जुलै 2020 रोजी परिवहन मंत्री सरनाईकांकडून मंजुरी बाबत सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती खुद्द खताळ यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिली आहे तसेच त्याबाबतचे दस्तावेज देखील त्यांनी सादर केले आहे. पाठपुराव्याला यश आले तांबे यांचा दावा संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे ही माजी अनेक वर्षांपासून ची सातत्यपूर्ण मागणी आहे संगमनेर अकोले आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नव्याने निश्चित झालेल्या शासनाच्या निकषानुसार संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन होणे आवश्यक आहे याबाबत मंत्री सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या मागणीची दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या अशी फेसबुक पोस्ट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे यांनी केलेला पाठपुरावा संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळावे यासाठी सत्यजित तांबे यांनी 17 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्यानंतर 24 मार्च 2025 रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत याबाबत मागणी लावून धरली तसेच 12 जुलै 2025 पावसाळी अधिवेशनात देखील याबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला होता अखेर आपण सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन आरटीओ कार्यालय साठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिले आहे असे देखील तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाशिक पुणे रेल्वे वरून तांबे खताळ भिडले नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे अशी भूमिका तांबे यांनी लावून धरली तसेच खताळ यांनी देखील आपली हीच भूमिका मांडली मात्र हा रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाकडून घेण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला तर केवळ राजकीय विरोध म्हणून या गोष्टीकडं पाहता विकास कामासाठी एकत्र यावे असे आव्हान खताळ यांनी देखील केले दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आमदारांची बैठक झाली तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला मात्र रेल्वे रद्द झाल्या च्या कारणावरून तांबे व खताळ यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुरूच होते. त्यामुळे टीकाटिपाने असो किंवा विकास कामांचे श्रेय घेणे संगमनेर मध्ये तांबे व खताळ या नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची कार्यवाही वेगवान

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बीड’च्या सभासद व ठेवीदारांसंदर्भात बैठक पार पडली. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे तातडीने परत मिळवून देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ठेवीदारांचे हित जपण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. हा कायदा अधिक सक्षम करून त्याअंतर्गत वित्तीय संस्था किंवा बँकांच्या मालमत्ता जप्त करणे आणि त्यांचा लिलाव करणे, ही प्रक्रिया जलद करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार क्लिष्ट आणि दीर्घकालीन प्रक्रियेला यंत्रणांना सामोरे जावे लागते. या प्रक्रियेत बदल करून, केंद्र शासनाच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या धर्तीवर अशा प्रकरणांतील जप्तीच्या कार्यवाहीसाठी राज्यातही व्यवस्था तयार करावी. यामुळे मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई जलद गतीने करणे शक्य होईल. बँकेच्या किंवा संस्थेच्या सर्व मालमत्तांचे अचूक मूल्यांकन करून, ज्या मालमत्तांचे मूल्यांकन सर्वाधिक आहे, त्यांची प्राधान्याने विक्री केली जावी. मूल्यांकनानुसारच मालमत्तांची विक्री करून पारदर्शक पद्धतीने हा निधी थेट गुंतवणूकदारांना दिला जावा. या संपूर्ण प्रकरणाचा तिढा तातडीने सुटण्यासाठी गृह विभागाने अंमलबजावणी संचालनालयासोबत (ईडी) एकत्र बैठक घ्यावी आणि या कायदेशीर व तांत्रिक बाबींवर तातडीने कोणती पावले उचलता येतील, याबाबतची ठोस कार्यपद्धती निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis: ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची कार्यवाही वेगवान Read More »

arbaz shaikh

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद

Tukaram Munde : ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणात अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपचारादरम्यान रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत कठोर निर्देश जारी केले होते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल दुकान अखेर बंद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझ्यासाठी हा विषय आता संपला आहे,” असे म्हटले. तसेच, रुग्णांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वांचे आभार मानत ही कारवाई सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असल्याचे त्याने नमूद केले. एफडीएने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार कोणतेही हॉस्पिटल रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एफडीएकडून अशा प्रकरणांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले?

Sujay Vikhe : गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली की, आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे.मात्र, गणेश कारखान्याशी संबंधित न्यायालयीन वादाबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. कर आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे ना. राधाकृष्ण विखे पाटील किवा डॉ सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याचे सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्द्यांवर चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राहाता शहराच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना डॉ. विखे म्हणाले, आजचे राहाता आणि दोन वर्षांनंतरचे राहाता शहर यात मोठा फरक दिसेल.शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलून जाईल. विकासकामांवरच आमचा भर राहणार आहे. भाजपच्या संघटन शक्तीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही.” शेवटी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. आपले राजकारण विकास, प्रगती आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. शांत राहा आणि विकासाची कामे करत राहा.असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले? Read More »

tukaram munde

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून जोरदार कारवाया सुरू केल्या आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यातच नगर शहरात देखील मुंढे हे एक्शन मॉडमध्ये दिसून आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर कारवाई करत थेट हॉटेलच्या परवाना निलंबित करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने अस्वच्छतेचा ठपका ठेवत नगर पुणे रस्त्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल संगम’ आणि ‘हॉटेल सत्कार’ या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. शहरात सध्या अन्न सुरक्षा मोहिमेअंर्तगत विविध आस्थापनांची तपासणी सुरू असून, या हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छता आढळल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ही कायदेशीर कारवाई केली आहे. आयुक्त मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून राज्यभरात अवैध गुटखा, दूध भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेवर कारवाईचा धडाका लावला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील इतर हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द Read More »

sangli district central cooperative bank

Sangli District Central Cooperative Bank : आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली DDC बँकेतील भरतीवरील स्थगिती उठवली

Sangli District Central Cooperative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीप्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भरतीवरील शासनाची स्थगिती उठवत न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य सरकारने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही स्थगिती कायम राहिल्याने बँक प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने भरतीवरील स्थगिती उठवली. सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असली, तरी तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ४४४ पदांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्षेप घेतला होता. बँकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने भरतीला स्थगिती दिली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २४ जूनपासून आयबीपीएसमार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता पुन्हा वेगाने पुढे जाणार आहे.

Sangli District Central Cooperative Bank : आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली DDC बँकेतील भरतीवरील स्थगिती उठवली Read More »

team india

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार?

Asia Cup 2027 : 2027 च्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, ही स्पर्धा बांगलादेशात आयोजित करण्याचा प्रस्ताव असून, भारताच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याच्या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ बांगलादेशात खेळण्यासाठी जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही वृत्तांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) स्पर्धेबाबत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अंतिम निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) किंवा BCCI यांनी भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या प्रामुख्याने माध्यमांतील अहवालांवर आधारित आहेत. याआधीही भारत-पाकिस्तान संबंधांमुळे आशिया चषकाचे आयोजन आणि सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 2027 च्या स्पर्धेबाबतही अंतिम निर्णय राजनैतिक परिस्थिती आणि ACC च्या भूमिकेनुसार घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार? Read More »

siya goyal

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Siya Goyal : लोहगड किल्ल्यावरून ढकलून २५ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेत २० वर्षीय सिया गोयल आणि २२ वर्षीय चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून ढकलून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. केतन आणि सिया यांचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सांकेतिक शब्द आणि संकेतांचा वापर आढळून आल्याने त्या संभाषणांचा अर्थ उलगडण्यासाठी तसेच तपास पुढे नेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, बचाव पक्षाने या मागणीला विरोध करत, तपासासाठी पोलिसांना यापूर्वीच पुरेसा कालावधी मिळाल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी Read More »

student

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

MHT-CET : एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ई., बी.टेक. तसेच पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अधिकृत सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची संधी असेल. विद्यार्थी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येतील. सर्व हरकतींची छाननी झाल्यानंतर २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पर्याय नोंदणी (Option Form) आणि सीट वाटपाच्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर होईल. यंदा प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणीची सुविधा शनिवार आणि रविवारही सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी स्क्रुटिनी केंद्रात जाऊन किंवा निवडलेल्या पद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. दरम्यान, यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्याची संधी मिळवली. आता प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणीची प्रक्रिया शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी Read More »