DNA मराठी

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

sex racket

Girgaon High Profile sex Racket : गिरगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात सिनेसृष्टीशी संबंधित एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मेकअप आर्टिस्टने चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ग्राहकांशी जोडण्याचे काम केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले.

तपासादरम्यान दोन महिलांसाठी एकूण दोन लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने या व्यवहारातून कमिशन घेऊन महिलांना संबंधित हॉटेलमध्ये आणल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांनी कोणत्याही महिलेची ओळख जाहीर केलेली नाही. तपासादरम्यान आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत महिलांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर दलाल किंवा संबंधित व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *