DNA मराठी

स्पोर्ट्स

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 खूप खराब केला असून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये संघाला पोहचता आलेला नाही. मात्र संघाने या स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांनंतरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या संघाने रविवारी त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. संघ आठ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली 10 व्या स्थानावर राहिला. आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर आता धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांना वाटले की हा धोनीचा शेवटचा हंगाम आहे आणि तो या हंगामानंतर निवृत्त होईल. पण हंगाम संपल्यानंतर, 43 वर्षीय धोनीने त्याचे पत्ते उघड केले आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने पुढील हंगामात खेळणार की नाही हे सांगितले आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आमचा हंगाम चांगला नव्हता, पण हा एक उत्तम कामगिरी होता. या हंगामात आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, पण आज आम्ही अनेक चांगले झेल घेतले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही.” तो म्हणाला, “शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. आता मी रांचीला जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असे देखील म्हणत नाही की मी परत येत आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन.” आयपीएल 2025 मध्ये धोनीची कामगिरी कशी होती? आयपीएल 2025 मध्ये गुजरातविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. धोनीने आयपीएल 2025 मध्ये 13 डावांमध्ये 135.17 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. त्याने या हंगामात 12 चौकार आणि 12 षटकार मारले. आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनंतर धोनी सीएसकेचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू केला आहे, ज्यामुळे सर्व संघांना दिलासा मिळाला आहे. परंतु या नियमानुसार, संघांना एका अटीवर सहमती द्यावी लागेल. बीसीसीआयने नवीन नियम लागू केला उर्वरित 17 सामन्यांसाठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना बदली खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी दिली आहे. अहवालानुसार, यापूर्वी, लीग टप्प्यातील 12 सामन्यांनंतर, खेळाडू दुखापती, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर असल्यास संघांना बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करता येत नव्हती. या हंगामात आतापर्यंत अनेक संघांनी 12 सामने खेळले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बोर्डाने उर्वरित सामन्यांसाठी यावर सूट दिली आहे. याचा अर्थ असा की संघ आता नवीन खेळाडूला करारबद्ध करू शकतात. ही स्थिती संघांसमोर असेल या नियमासोबतच बीसीसीआयने संघांसमोर एक अटही ठेवली आहे. बोर्डाने आधीच सांगितले आहे की हे नियम फक्त तात्पुरते मानले पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले तर ते फक्त या हंगामासाठी असेल. तसेच संघ त्याला पुढील हंगामासाठी राखू शकत नाहीत. जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर संघ त्याला थांबवू शकत नाही आणि पुढच्या हंगामातच त्याला खरेदी करावे लागेल, जिथे तो खेळाडू पुन्हा त्याच संघासोबत खेळू शकेल अशी आशा फारच कमी असेल. हा नियम सर्व 10 संघांसाठी आहे. पण याचा फायदा फक्त 7 संघांनाच होईल. कारण तीन संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहेत. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ सीएसके आहे.

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत

RCB vs PBKS: आयपीएल 2025 मध्ये बंगळुरू च्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे. पावसामुळे हा सामना 14 – 14 ओव्हर्सचा करण्यात आला होता. प्रथम गोलंदाजी करताना या सामन्यात पंजाब किंग्जने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच विकेट्सने पराभव केला. बंगळुरूचा संघ फक्त 95 धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने आतापर्यंत बाहेर खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे, तर घरच्या मैदानावर खेळलेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिल्या चेंडूवर फिल साल्ट, रजत पाटीदार आणि टिम डेव्हिड यांनी चौकार मारून चांगली सुरुवात केली, परंतु तरीही फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. आरसीबीच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी शेवटच्या विकेटसाठी 32 धावांची होती. विशेष म्हणजे संघातील पहिल्या सहा फलंदाजांपैकी पाच खेळाडू पाचपेक्षा कमी धावा काढून बाद झाले. पावसामुळे बराच काळ झाकलेल्या खेळपट्टीच्या संथ आउटफिल्डसह उसळीमुळे फलंदाजांना त्रास झाला. पंजाबच्या गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी श्रेयस अय्यरने पाच गोलंदाजांचा वापर केला आणि सर्वांनी विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने फिल साल्ट आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. युझवेंद्र चहलने रजत पाटीदार आणि जितेश शर्माला बाद केले, तर मार्को जॅनसेनने क्रुणाल पांड्या आणि प्रभावशाली खेळाडू मनोज बंडाजे यांना बाद केले. हरप्रीत ब्रारने भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांचे बळी घेतले आणि आरसीबीला 95/9 पर्यंत रोखले. पंजाबची सावध सुरुवात पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य (16) आणि प्रभसिमरन सिंग (13) यांनी मोठी धावसंख्या उभारली नसली तरी त्यांच्या जलद सुरुवातीमुळे संघावरील दबाव कमी झाला. आरसीबीकडून जोश हेझलवूडने 14 धावा देत तीन विकेट घेतले. नेहल वधेराने 19 चेंडूत नाबाद 33 धावा करत पंजाबला पाच विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह, पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत Read More »

“माझ्यासाठी काहीच किंमत नाही…”करुण नायरची Karun Nair खेळी झळकली, पण संघाच्या पराभवाने खंत व्यक्त

Karun Nair – दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज करुण नायरने [Karun Nair] आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर केलेल्या पुनरागमनात चमकदार खेळी केली, परंतु संघाच्या पराभवाने त्याच्या आनंदाला मात्र ओहोटी लागली. मुंबई इंडियन्सविरुद्ध २०६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना नायरने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ८९ धावा करत अप्रतिम फलंदाजी सादर केली. त्याच्या या खेळीत जसप्रीत बुमराहच्या एका षटकात दोन षटकार मारण्यासारखी दुर्मीळ कामगिरीदेखील समाविष्ट होती. तयारीची गुरुकिल्ली करुण नायरने स्थानिक क्रिकेटमध्येही आपली तयारी सिद्ध केली आहे. विदर्भासाठी सर्व फॉरमॅटमध्ये १८७० धावा करत त्याने आपले फॉर्म आणि फिटनेस टिकवून ठेवले. याच मेहनतीच्या जोरावर तो आयपीएलमध्ये पुन्हा ठसा उमठवू शकला. “मी आधी आयपीएलमध्ये खेळलो आहे. मला माहित आहे की ही लीग किती स्पर्धात्मक आहे आणि विरोधी संघांकडून कशी तयारी असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे तयार होतो,” असं नायरने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. वैयक्तिक यशापेक्षा संघाचं महत्त्व त्याच्या वैयक्तिक खेळीबद्दल बोलताना करुण नायर [Karun Nair] म्हणाला, “बघा, त्याबद्दल बोलण्यात काही फायदा नाही. मी चांगला खेळलो, पण माझा संघ सामना गमावला, त्यामुळे खरोखर काही फरक पडत नाही. जर माझा संघ जिंकू शकत नसेल तर अशा खेळी माझ्यासाठी काहीच अर्थ नाहीत.” या विधानातून नायरची संघभावना आणि खेळातील परिपक्वता अधोरेखित झाली. संधीची वाट पाहत केलेली तयारी नायरने पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण तरीही त्याने संयम राखून स्वतःची तयारी सुरू ठेवली. “संघात निवड होणं हे नेहमीच कठीण असतं. पण मी माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी पूर्ण तयार होतो,” असं त्याने सांगितलं. त्याने स्पष्ट केलं की पॉवरप्लेमध्ये पारंपरिक शॉट्सवर भर देणं आणि नंतर गरजेनुसार इम्प्रोव्हायझेशन करणं, ही त्याची रणनीती होती. “स्वतःला थोडा वेळ द्या, सामान्य शॉट्स खेळा आणि नंतर परिस्थितीनुसार बदल करा,” असा त्याचा दृष्टिकोन. संघासाठी झपाटलेपणाचं दर्शन करुण नायरने [Karun Nair] याआधी भारतासाठी कसोटीत त्रिशतक ठोकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. IPL सारख्या वेगवान फॉरमॅटमध्येही त्याचा अनुभव आणि शांत डोकं संघासाठी मोलाचं ठरू शकतं. “माझं एकच लक्ष आहे – संघासाठी कामगिरी करणे. मी नेहमीच संघाच्या यशाला प्राधान्य दिलं आहे,” असं तो नम्रपणे म्हणाला. करुण नायरची ही खेळी भलेही संघासाठी विजय मिळवून देऊ शकली नाही, पण त्याच्या जिद्दीची, मेहनतीची आणि संघनिष्ठेची कथा क्रिकेटरसिकांच्या मनात नक्कीच उमटली. आगामी सामन्यांमध्ये त्याच्या अनुभवाचा आणि फॉर्मचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला निश्चितच होऊ शकतो.

“माझ्यासाठी काहीच किंमत नाही…”करुण नायरची Karun Nair खेळी झळकली, पण संघाच्या पराभवाने खंत व्यक्त Read More »

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल

IPL 2025 : रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल 12 धावांनी पराभव करत विजय नोंदवला आहे. मुंबईच्या विजयानंतर सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते वेगवेगळे कॉमेंट करताना दिसत आहे. करुण नायर – बुमराह वाद दिल्ली कॅपिटल्सकडून करुण नायरने शानदार कामगिरी केली. त्याने 89 धावांची खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ आणले. करुणने जसप्रीत बुमराहच्या षटकात 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या. दरम्यान, बुमराह आणि करुणमध्ये वाद झाला. करुणने बुमराहच्या चेंडूवर दोन धावा घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, पण धाव घेताना दोघांमध्ये टक्कर झाली, जी बुमराहला आवडली नाही. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बुमराहने करुणला काहीतरी सांगितले, ज्यावर करुण नायरने प्रत्युत्तर दिले आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. यादरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा बुमराह आणि करुण वाद घालत होते, तेव्हा रोहित शर्माने मान वळवून मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ 19 षटकांत 193 धावांवर सर्वबाद झाला आणि मुंबईला 12 धावांनी सामना जिंकता आला. या विजयासह, सलग दोन पराभवांनंतर मुंबईने हंगामातील पहिला विजय मिळवला. त्याच वेळी, सलग विजयांनंतर दिल्लीला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून करुण नायरने 89 धावा केल्या तर मुंबईकडून कर्ण शर्माने तीन विकेट्स घेत सामन्याचा मार्ग बदलला. मुंबईने 205 धावा केल्यानंतर, दिल्लीला 206 धावांचा पाठलाग करणे कठीण झाले.

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल Read More »

SRH vs GT: सिराज ‘चमकला’, हैदराबादवर गुजरातचा दणदणीत विजय

SRH vs GT : आयपीएल 2025 मध्ये रविवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी फायदेशीर ठरला. मोहम्मद सिराजच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाला फक्त 152 धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने फक्त 16.5 षटकांत विजय मिळवला. हैदराबादचा हा चौथा पराभव होता. हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (08) ने सिराजच्या चेंडूवर चौकार मारला पण नंतरच्या गोलंदाजाने त्याला बाद केले. यानंतर, सिराजच्या चेंडूवर मिड-ऑनवर झेल देऊन अभिषेक शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे संघाचा स्कोअर 2 बाद 45 धावा असा झाला. यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली, परंतु रेड्डी 31 धावा काढून बाद झाला. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 31 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स 22 धावांसह नाबाद राहिला आणि संघाचा धावसंख्या 153 धावांवर पोहोचला. गिलने 43 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी गुजरातकडून शुभमन गिलने 43 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने 29 चेंडूत 49 धावा केल्या, तर रदरफोर्डने 16 चेंडूत 35 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष्य फक्त 16.4 षटकांत पूर्ण केले. हैदराबादकडून मोहम्मद शमीने 2 आणि पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.

SRH vs GT: सिराज ‘चमकला’, हैदराबादवर गुजरातचा दणदणीत विजय Read More »

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली. 29 चेंडूत 60 धावा अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो Read More »

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) Ashwini Kumar – मुंबई, 31 मार्च 2025: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये त्यांची पहिली विजयाची नोंद केली आहे, वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सवर आठ विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईच्या पदार्पणवीर गोलंदाज अश्वनी कुमारच्या शानदार कामगिरीची आठवण करून देणारा आहे. त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच 24 धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेत केकेआरला व्यवस्थित बांधले. अश्वनी कुमार (Ashwini Kumar)च्या इम्प्रेसिव्ह कामगिरीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी 116 धावांचे साधे लक्ष्य 12.5 षटकांत पूर्ण करून सीजनची पहिली विजयाची लय तयार केली. रायन रिकल्टनने त्याच्या अर्धशतकी खेळीने संघाला मजबूत आधार दिला, तर सूर्यकुमार यादवने वेगवान फटकेबाजी करून विजयाचा षटकार लगावला. मुंबईच्या कप्तान हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या गोलंदाजी जोडीने केकेआरच्या सलामीवीरांना लवकरच खेळातून बाद केले. केकेआरने 16.2 षटकांत उर्वरित फलंदाजांची विकेट घेत संघ 116 धावांत गुंडाळला. मुंबईने आयपीएल २०२५ मधील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर या विजयाने संघाच्या मनोधैर्याला चांगला उंचावला आहे. या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आणि ते आता सहाव्या स्थानावर आहेत. १. केकेआरचा धोकादायक डाव कोसळला, अश्वनीचा जादुई स्पेल २. बोल्ट-चहरची सुरुवातीची मदत ३. केकेआरचा धीरगंभीर प्रयत्न, पण अपुरा ४. एमआयचा सहज पाठलाग, रिकेल्टन-स्कायचा धमाका

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी Read More »