DNA मराठी

राजकीय

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

Pratap Sarnaik : ST चे उत्पन्न वाढणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ‘पंचसूत्री’ प्लॅन तयार

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज एसटी स्वतःला ‘चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी १० वाजता आगारात, ११ ला विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा मंत्र या बैठकींना दिला आहे. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे. चालक–वाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे – कार्यक्षमतेवर भर डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे KPTL (किलोमीटर प्रति १० लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे. तिकीट विक्री ही महसुलाची जीवनवाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM(संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज — सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल. ‘प्रवासी देवो भव’ – सुविधांचा दर्जा उंचावणार स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत. एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मत यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. १ जानेवारीला बसस्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाईल. वक्तशीरपणा आणि नियमितता ही एसटीची नवी ओळख बनवण्याचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८०% पेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे— अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात होत आहेत. यासोबतच ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.

Pratap Sarnaik : ST चे उत्पन्न वाढणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ‘पंचसूत्री’ प्लॅन तयार Read More »

supriya sule

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule: तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक आता चारही बाजूने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे. असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल

Maharashtra Cabinet Decisions: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटी, नागपूर जिल्हा बँकेला 81 आणि धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले आहे. त्यानुसार आज या तीनही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास संस्थांचेही अस्तित्व असते. त्यामुळे नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँक यांना एकूण 827 कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात 336 कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात 336 कोटी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली. नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे. मात्र धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल Read More »

Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभाऱ्यांची नियुक्ती

Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे. नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभाऱ्यांची नियुक्ती Read More »

ahilyanagar

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज (ता. ११) सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत काढण्यात आली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा हाती लागली आहे. इच्छुकांनीही संबंधित पक्ष श्रेष्ठींकडे आपली निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. प्रभाग १ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ——————— प्रभाग २ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————- प्रभाग ४ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग ५ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ६ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ७ अ – अनुसूचित जमाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग ८ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग ९ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १० अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग ११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ————————- प्रभाग १३ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग १४ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग ब – सर्वसाधारण महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग १५ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण ———————– प्रभाग १६ अ – अनुसूचित जाती महिला ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण ड – सर्वसाधारण ———————— प्रभाग १७ अ – अनुसूचित जाती ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क – सर्वसाधारण महिला ड – सर्वसाधारण

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमच्या प्रभागाची स्थिती Read More »

maharashtra local body election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि स्थानिक आघाड्यांची चाचपणी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावरील चर्चेचा निष्कर्ष अद्याप निघालेला नसल्याने, अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हाऐवजी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. यंदा उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी, ६७ पदे मागास प्रवर्गासाठी, तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात ६.३४ लाख मतदार, १७ स्थानिक संस्था रणांगणातपुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६,३४,९४० मतदार आहेत. बारामती ही ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची या नगरपरिषदा ‘ब’ वर्गात येतात. सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या ‘क’ वर्गातील नगरपरिषदा आहेत. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठीही आचारसंहिता लागू झाली असून या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषदेत प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असून एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी थेट मतदान होणार असल्याने या नगरपरिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ढवळून निघणार आहेत. कोण जिंकणार स्थानिक सत्तेची लढाई, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार? Read More »

shankarrao gadakh

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक

Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे. तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक Read More »

prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर सातारा जिल्ह्यातील फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात बीडच्या वडवणीतील कवडगाव येथे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची मागणी शासनाकडे केली आणि ती मागणी पूर्ण झाली. दोन दिवसांपूर्वी एसआयटीचे प्रमुख इथे कुटुंबाला भेटून गेले. आलेल्या बातम्यांवरून कळतंय डॉक्टरांना प्रेशराईज केलं जातं होते. वर्षभरात जेवढे पोस्टमार्टम महिला डॉक्टरच्या देखरेखीखाली झाली त्याची चौकशी एसआयटीने करावी. त्या केसमध्ये प्रेशराईज टाकलं जात होतं का नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रेशर कोण टाकत होतं? डॉक्टर मंडळी टाकत होती की राजकीय क्षेत्रातील की सामाजिक क्षेत्रातील मंडळी होती? त्यांचे फोन कॉल तपासले पाहिजेत त्यातून या आत्महत्याच खरं कारण कळेल. मुख्यमंत्री जे स्टेटमेंट करतात ते पोलिसांकडून माहिती घेऊनच करतात जे चुकीची माहिती मुख्यमंत्र्याला देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सूर्यवंशी प्रकरणात देखील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांला चुकीची माहिती दिली आणि ती सभागृहात त्यांनी मांडली. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या. जे कोणी आरोपी असतील राजकीय क्षेत्रातले असो किंवा इतर क्षेत्रातील असो त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »