DNA मराठी

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द

tukaram munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून जोरदार कारवाया सुरू केल्या आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यातच नगर शहरात देखील मुंढे हे एक्शन मॉडमध्ये दिसून आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर कारवाई करत थेट हॉटेलच्या परवाना निलंबित करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने अस्वच्छतेचा ठपका ठेवत नगर पुणे रस्त्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल संगम’ आणि ‘हॉटेल सत्कार’ या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

शहरात सध्या अन्न सुरक्षा मोहिमेअंर्तगत विविध आस्थापनांची तपासणी सुरू असून, या हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छता आढळल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ही कायदेशीर कारवाई केली आहे.

आयुक्त मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून राज्यभरात अवैध गुटखा, दूध भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेवर कारवाईचा धडाका लावला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील इतर हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *