DNA मराठी

Ahilyanagar

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर

Ahilyanagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगर ल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गावे आणि तब्बल ५०० वाड्या-वस्त्यांवर सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. या गावे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश असून, याद्वारे यातील सुमारे १ लाख ४१२२ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. तसेच नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत असलं तरी तो गावाला पूर्णपणे पाणी देऊ शकत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो तर काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.दरम्यान, जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात ९०० कोटींवर खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »

petrol

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Petrol Price Today: अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मुबलक इंधन उपलब्ध जिल्हा प्रशासनाने IOCL, BPCL व HPCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली असून, मागील सात दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक इंधन पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींवर तत्काळ कार्यवाही काही पेट्रोल पंपांवर बिलिंग किंवा क्रेडिटच्या तांत्रिक कारणांमुळे किरकोळ विलंब झाल्यास, प्रशासनाकडून अवघ्या ४ ते ५ तासांत इंधन उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यात येत आहे. प्रशासनाचा प्रभावी समन्वय शासनाचे संबंधित विभाग, गॅस एजन्सीज व पेट्रोल पंप चालक यांच्यात योग्य समन्वय राखण्यात आला असून, सर्व प्रकारचे इंधन सुरळीत उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून करण्यात आले आहे.

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका Read More »

neet exam

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक

Neet Exam: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या महाडुक सेंटर (माहेगाव) येथपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात येथील बीए एम एस शिक्षण घेतलेल्या धनंजय निवृत्ती लोखंडे यांस सीबीआयच्या तपास पथकाने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने राहुरीमध्ये खळबळ उडाली आहे.  नाशिक येथील शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तो फरार होता. धनंजय याने दोन वर्षापूर्वी आपले वैद्यकीय शिक्षण कर्नाटक येथील मंगरूळ येथे पूर्ण केले. गेल्या चार वर्षापासून तो पुणे येथील वाघोली येथे वास्तव्यास असून त्याने येथे प्रॅक्टीस देखील करत असल्याचे सांगण्यात येते. मेडिकल ॲडमिशन कॉन्सिनिलिंगचे देखील तो काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील एका शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करतात. सीबीआयने नाशिक येथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय याचे नाव समोर आल्याने त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. याबाबत कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, धनंजय असे कृत्य करू शकत नसल्याचे माध्यमांना नंतर त्यांनी सांगितले. नीट प्रकरणाचे मोठे रॅकेट यामधून बाहेर येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत असून सीबीआय आता काय तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक Read More »

oplus 131072

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल

Nilesh Lanke: नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भोंदूबाबा नानासाहेब विरकर आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके दिसत आहे. राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे. खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल Read More »

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »

mummaka sudarshan

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली

Mummaka Sudarshan :  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांच्या बदलीची चर्चा मागील एका महिन्यापासून सुरू होती. अवघ्या एका वर्षात घार्गे यांनी बदली झाल्याने जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. सोमनाथ घार्गे यांनी वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यावर मोठे बदल करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत गोवंशीय जनावरांच्या हत्येविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे समाजात त्यांच्या विषयी चांगली भावना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील आमली पदार्थ तस्करी प्रकरणात थेट जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच दोषी आढळल्याने पोलीस प्रशासनात घार्गे यांच्याबाबत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बडतर्फी आदी प्रकरणेही यामागे असल्याची चर्चा आहे. अशातच घार्गे यांची मुंबई येथील पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निघाले. तर चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरमध्ये बदलीचे आदेशही निघाले. या बदलीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली Read More »

Ahilyanagar Accident: अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज बायपास शिवारात बसचा अपघात; 20 जण जखमी

Ahilyanagar Accident : वाळुंज बायपास परिसरात रविवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एसटी बस आणि वऱ्हाडाची स्कूल बस यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने स्कूल बसला जोराची धडक दिल्याने २०ते २१ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड चिंचोडी पाटील येथील नागरिक लग्न समारंभ आटोपून परत येत असताना वाळुंज उड्डाणपुलाखाली हा अपघात घडला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत चार जखमींना आपल्या वाहनातून जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित पाच जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले. स्थानिक नागरिक आणि मदतकार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर काढून तातडीने मदत केली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ahilyanagar Accident: अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज बायपास शिवारात बसचा अपघात; 20 जण जखमी Read More »

heatwave

Heatwave Alert : जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Heatwave Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, पुढील काही दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत : नागरिकांनी काय करावे ? कामगारांसाठी व कामाच्या ठिकाणच्या सूचना काय करू नये ? पशू-प्राण्यांची काळजी आणि आपत्कालीन संपर्क

Heatwave Alert : जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन Read More »