DNA मराठी

Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK साठी खेळणार? चेन्नईने स्पष्ट सांगितलं

hardik pandya

Hardik Pandya : आयपीएल 2027 ची आतापासूनच संघ मालकांनी तयारी सुरू केली असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपल्या संघाची ताकद वाढवण्यासाठी संघ मालक सध्या प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) जाणार असल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्या सीएसकेमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने या सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी यावर भाष्य करत पांड्याबाबत कोणतीही ट्रेड चर्चा झालेली नसल्याची माहिती दिली आहे. 2027 मध्ये मुंबईकडून हार्दिक पांड्या खेळणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याने अनेक फ्रँचायझींनी त्याच्याविषयी स्वारस्य दाखवल्याच्या बातम्या समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची नावे संभाव्य दावेदारांमध्ये घेतली जात आहे मात्र आता चेन्नई सुपर किंग्सने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संघाचा हंगामोत्तर आढावा अद्याप झालेला नसून, मेजर लीग क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतरच खेळाडूंबाबत निर्णय घेतले जातील. त्यामुळे सध्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याची माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनेही सध्या कोणत्याही खेळाडूच्या ट्रेडसंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. संघाचा हंगामाचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असे फ्रँचायझीकडून सांगण्यात आले. यामुळे हार्दिक चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला असून, आगामी आयपीएल ट्रेड विंडोमध्येच त्याच्या भवितव्याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *