Rahul Gandhi: २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल केवळ काँग्रेसच्या पराभवाचे पुरावे नसून, पक्षाच्या सामाजिक ढासळत्या पायाचे सर्वात भीषण चित्र समोर आणणारे ठरले आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील आकडेवारी पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या राज्यांत हिंदू मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहेच, पण काँग्रेसने उभे केलेले हिंदू उमेदवारही सपशेल नाकारले गेले आहेत. जिथे काँग्रेसचे हिंदू उमेदवार निवडून आले आहेत, तिथेही त्यांच्या विजयाची दोरी ही ‘अल्पसंख्याक’ मतदारांच्या हातात असल्याचे दिसून येते.
गौरव गोगोईंचा पराभव
आसाममध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या, पण त्यातील १८ आमदार मुस्लिम आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचा मुख्य चेहरा गौरव गोगोई यांचा स्वतःच्या हिंदू बहुल मतदारसंघातून झालेला पराभव.
एकमेव हिंदू आमदार
काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार प्रदीप सरकार हे अभयपुरी दक्षिण (Abhayapuri South) मतदारसंघातून निवडून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा मतदारसंघ बोंगाईगाव जिल्ह्यात येत असून येथे मुस्लिम मतदारांची संख्या ६०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या एकमेव हिंदू आमदारालाही निवडून आणण्यासाठी मुस्लिम मतदारांच्या कौलाची गरज भासली.
तर दुसरीकडे जनेइया, धुब्री, जलेश्वर आणि गौरिपूर यांसारख्या पूर्णतः मुस्लिम बहुल (८०% हून अधिक लोकसंख्या) पट्ट्यातूनच काँग्रेसचे उर्वरित १८ उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत.
केरळ: ‘ख्रिश्चन-मुस्लिम’ जोरावर विजय
केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ (UDF) ला ६३ जागा मिळाल्या असल्या तरी, विजयाचा चेहरा हिंदू उमेदवारांसाठी चिंतेचा आहे. ६३ पैकी ४६ ख्रिश्चन आणि १२ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. तर
९२ पैकी तब्बल ८७ हिंदू मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे हिंदू उमेदवार सपशेल फेल ठरले आहेत. पक्षाचे केवळ ५ हिंदू आमदार विधानसभेत पोहोचू शकले. हिंदू मतदारांनी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांना डावलून एकतर डाव्या आघाडीला (LDF) किंवा भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे कल दिला आहे.
पश्चिम बंगाल: काँग्रेसचे अस्तित्व ‘मुर्शिदाबाद’पुरते मर्यादित
बंगालमध्ये भाजपने २०६ जागांसह सत्ता मिळवली असताना, काँग्रेसच्या वाटेला आलेल्या २ जागांचे वास्तव अधिक दाहक आहे. राणीनगर (Raninagar) येथून काँग्रेसचे झुल्फिकर अली विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यात असून येथे मुस्लिम लोकसंख्या ८०% च्या आसपास आहे. फराक्का (Farakka) येथून काँग्रेसचे मोताब शेख विजयी झाले आहेत. येथेही मुस्लिम मतदारांचे प्रमाण ६८% हून अधिक आहे.
हिंदू मतदारांचा ‘शून्य’ कौल:
बंगालच्या हिंदू मतदारांनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असून, पक्षाचा एकही हिंदू उमेदवार विधानसभेत पाय ठेवू शकलेला नाही.






