DNA मराठी

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत

परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली.

तर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *