DNA मराठी

Chhagan Bhujbal : प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद? छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांची भेट झाली असेल, ते आम्हालाही अधूनमधून भेटतात; मात्र त्यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुनील तटकरे यांनी पक्षाला कोणत्याही राजकीय सल्लागाराची गरज नसल्याचे मत व्यक्त केले असेल, तर ते त्यांचे मत असल्याचे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या चर्चेवरही भुजबळ यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्यावर प्रेम होते म्हणूनच आपण शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत आलो, असे त्यांनी सांगितले. पक्षात मतभेद असू शकतात, मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

रुपाली ठोंबरे यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील टीकेबाबतही भुजबळ यांनी सर्वांनी संयमाने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळताना सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *