DNA मराठी

DNA Marathi News

kangana ranaut

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासारख्या अतिसंवेदनशील परिसरात आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशभरात विविध विद्यार्थी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे तसेच लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे अनेक खासदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकारवर टीका करण्यात आली आणि पंतप्रधान तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौत म्हणाल्या की, देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागणे किंवा तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असला तरी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ठिकाणांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. कंगना यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसने आपल्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी रंग चढला आहे.

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका Read More »

Crime

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे उघडकीस आल्याने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे. अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील या हॉटेलमध्ये मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. यासाठी १५ जून व १९ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित सुनावणीस गैरहजर राहिले. पोलीस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर झालेला असून, भविष्यात पुन्हा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मूळ जमीन व घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रशासन अधिक प्रभावी करणे, ग्रामीण भागाचा विकास आणि विविध योजनांना गती देण्यावर भर देण्यात आला. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’ राबविण्याचा. या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्याला पाच कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेती, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय विविध विभागांशी संबंधित विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक निर्णयही घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत विकासकामांचा वेग वाढविणे, निधीचा प्रभावी वापर करणे आणि मागास भागांतील विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील विकास प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विशेषतः आकांक्षित तालुका कार्यक्रमामुळे मागास तालुक्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. शरद पवार म्हणाले की, देशातील स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. पेपरफुटी किंवा गैरप्रकारांमुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यांनी सरकारवर टीका करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. जंतरमंतरवरील आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे देशभरातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा Read More »

ahilyanagar district bank election

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत?

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरणाने आधीच निवडणुकीचा रंग धारण केला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पूर्वी विकास, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढल्या जात असत. आता मात्र त्यांचे स्वरूप सत्तेच्या अंकगणितात अडकत चालल्याची भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती “घोडेबाजार” आणि अंतर्गत राजकीय हालचालींची. पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांत विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क, गाठीभेटी आणि मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या चर्चांची सत्यता संबंधितांनाच माहीत; मात्र अशा चर्चांनाही वाव मिळणे, हेच सहकार चळवळीसाठी चिंतेचे लक्षण आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने समीकरणे बदलत आहेत. कर्जत-जामखेडच्या राजकारणापुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद आता संपूर्ण जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात कसोटीला लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके हेही आपापल्या पातळीवर राजकीय मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींविषयी. एकाच पक्षातील वेगवेगळे प्रभावकेंद्रे आपापले संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. ही स्पर्धा जर उघड संघर्षात बदलली, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत मतभेदच अनेकदा निर्णायक ठरतात, हा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. सहकार संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्या शेतकरी, सभासद आणि ग्रामीण उद्योगांच्या विश्वासावर उभ्या आहेत. अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विचारांपेक्षा व्यवहार, तत्त्वांपेक्षा तडजोडी आणि सेवाभावापेक्षा घोडेबाजार चर्चेचा विषय ठरू लागला, तर सहकाराच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक कोण जिंकणार, यापेक्षा ती कशा पद्धतीने लढवली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. पारदर्शकता, लोकशाही आणि सभासदांचा विश्वास या तीन मूल्यांवरच सहकाराचे भविष्य टिकून राहणार आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता बदलेल पण सहकार मात्र हरत जाईल.

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत? Read More »

fifa world cup

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा अतिरिक्त वेळेत पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. न्यू जर्सीतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र अतिरिक्त वेळेच्या 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने निर्णायक गोल झळकावत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत अर्जेंटिनाच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अनेक अप्रतिम बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र अतिरिक्त वेळेत स्पेनच्या वेगवान हल्ल्यापुढे अर्जेंटिनाची बचावफळी अखेर ढासळली. सामन्याच्या उत्तरार्धात एन्झो फर्नांडेझला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. या पराभवासह लिओनेल मेस्सीचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. अनुभवी मेस्सीला स्पेनच्या शिस्तबद्ध बचावापुढे प्रभावी खेळ करता आला नाही. अंतिम शिट्टीनंतर स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष केला, तर अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर विश्वचषक जिंकत जागतिक फुटबॉलमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा

Sanjay Raut on BJP : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत म्हणाले की, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे देशातील तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे. लोकशाहीत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांवर कारवाई करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अभिजीत दिपके यांनीही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत लोकशाहीत विरोधी मतांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राजकारण न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा Read More »

cjp protest

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं?

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे संसद मार्चसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी निष्पक्ष चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून काहींना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, वारंवार होणाऱ्या परीक्षा गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हस्तक्षेप करावा लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यार्थी संघटनांनी सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा देशभर आंदोलनाचा विस्तार केला जाईल, असा इशारा दिला आहे.

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं? Read More »

kunal kamra

Kunal Kamra : कुणाल कामराच्या “सीता के पती का नाम लेकर……” वक्तव्यारुन वाद पेटला, अडचण वाढली!

Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा हा सरकारवर टिका करण्यामुळे चर्चेत असतो. आता नीट पेपरफुटी प्रकरणामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला त्याने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक हे उपोषनाला बसलेले असून त्यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. कुणाल कामराने बुधवारी (15 जुलै) आंदोलनात सहभागी होऊन एक विधान केले होते, त्यामुळे तो अडचणीत आला आहे. तुम्हाला जर कोणी मोदी समर्थक भेटला किंवा भाजपचा मतदार भेटला आणि तो मोदींनी केलं ते योग्य केलं असं म्हणत असेल तर त्याच्याशी वाद घालत बसू नका, कारण तुमचा वेळ वाया जाईल. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातील आणखी एक गांधी येथे उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही. मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच या आंदोलनाची पहिली वीट रचली गेली असं कुणाल कामरा म्हणाला. तसेच याच भाषणात त्याने एक विधान केले, त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. “ये सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहे है” (भगवान रामाचे नाव घेऊन ते मुकेश अंबानींचं काम करत आहेत) असे त्याने सरकारला उद्देशून म्हटले आहे. याच वाक्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अमिता सचदेव यांनी कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. कुणाल कामराने या भाषणाचा व्हिडिओ डिलीट करावा आणि तातडीने माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. वकिल अमिता सचदेव यांच्यामते, कुणाल कामराने सरकारवर खुशाल टिका करावी, पण देवाचे नाव बदनाम करु नये. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणालने जाहीरपणे माफी मागावी असे अमिता सचदेव यांनी म्हटले आहे.

Kunal Kamra : कुणाल कामराच्या “सीता के पती का नाम लेकर……” वक्तव्यारुन वाद पेटला, अडचण वाढली! Read More »

img 20260718 wa0002

Shrirampur Murder Case : श्रीरामपूर हत्याकांड! खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा …आमदार ओगले यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Shrirampur Murder Case : सकल श्रीरामपूरकरांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन श्रीरामपूर येथील युवा उद्योजक स्व. आकाश दुबैय्या यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा व सरकारी वकील म्हणून खासदार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र सुपूर्द केले. यावेळी श्रीरामपूर मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, संघटित गुन्हेगारांना मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावे तसेच पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी आर्थिक हितसंबंध असून सदर पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी निश्चितच ठोस कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली.

Shrirampur Murder Case : श्रीरामपूर हत्याकांड! खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा …आमदार ओगले यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी Read More »