Devendra Fadnavis

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन […]

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी Read More »

dattatray bharne

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

Dattatray Bharne : राज्य सरकारच्या वतीने पहिल्यांदा छोट्या आणि दुसऱ्यांदा साधारण १७ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. कर्जमाफीसाठी केवायसी (KYC) चे काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 लाखांच्या आसपास काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ Read More »

manoj jarange on eknath shinde

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Manoj Jarange on Eknath Shinde : मराठवाड्यातील काही मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने त्यांना साथ दिली होती, परंतु

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा Read More »

abhijit deepke

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार

Abhijit Deepke : सीजेपी (CJP) च्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सत्तेची नव्हे, तर मजबूत लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्यावरील एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख “गुंगी गुडिया” असा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले

Chhagan Bhujbal : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या होर्डिंग्जमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यांच्या

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले Read More »

dhanjay mumde

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »

income tax

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क

Income Tax : अनेक करदात्यांना असे वाटते की, उत्पन्नावर कोणताही आयकर लागत नसेल तर आयकर विवरणपत्र (Income Tax Return-ITR) दाखल करण्याची गरज नाही. मात्र, आर्थिक नियोजन आणि भविष्यातील विविध व्यवहारांच्या दृष्टीने ITR दाखल करणे फायदेशीर ठरू शकते. कर देय नसतानाही नियमितपणे ITR भरल्यास अनेक महत्त्वाचे लाभ मिळू शकतात. ITR हा व्यक्तीच्या उत्पन्नाचा अधिकृत दस्तऐवज मानला

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

rohit pawar

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on NEET Exam : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमध्ये पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा त्यांनी केला असून, या संदर्भातील काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. रोहित पवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना थांबण्याऐवजी वाढत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप Read More »

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत Read More »