DNA मराठी

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक प्रशिक्षण शासनाकडे नाही. त्यामुळे मंदिरांचे संचालन आचार्यांच्या समितीकडे दिल्यास धार्मिक परंपरा आणि मंदिरांची पवित्रता अधिक प्रभावीपणे जपली जाईल.

राम मंदिर चोरीप्रकरणी सरकारने तत्पर कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याची भरपाई होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्राचार्य महाराज यांनी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगितले. मात्र, केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *