Devendra Fadnavis

sunil tingre

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

Sunil Tingre : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष असले, तरी पुणे महापालिकेतील राजकारणात दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासनिधी देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादीच्या […]

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र Read More »

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »

sanjay raut

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस 

Sanjay Raut on PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जुन्नर अत्याचार प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण असून, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सरकारची भूमिका काय, असा सवाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला काही वाटत नाही का? याबद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही का?” असा सवाल करत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर ‘फेल्युअर मुख्यमंत्री’ अशी टीका केली. पोलिसांनीही या प्रकरणात हात वर केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेचे स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौघुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचा दावा राऊत यांनी केला. संबंधित मुलगी न्यायासाठी विविध ठिकाणी जाऊन थकली असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत चार-चार तास बसवून ठेवतात आणि प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले. “नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, नाहीतर मी हे प्रकरण मार्गी लावेन,” असे ते म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे या प्रकरणात कोणाला वाचवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून वरून दबाव येत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य टाळले सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावर टीका मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधानांचा दौरा कठीण असताना मंत्र्यांनी खात्याचे काम सोडून विद्यापीठात जाण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. “विद्यापीठात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये या मंत्र्यांनी जावे,” असे राऊत म्हणाले. भाजपसोबत आता जनरेशन झेड येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, असे म्हणत त्यांनी या दौऱ्याची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदींवरही निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसावरूनही राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,” असे ते म्हणाले. 17 सप्टेंबरनंतर मोदींना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगत राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्यावरही टीका केली. मोदींच्या वाढदिवशी समर्थकांनी उत्सव साजरा करावा; त्यानंतरच्या राजकीय घडामोडी पाहा, असे ते म्हणाले. चंपत राय यांच्यावरूनही टीका चंपत राय यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना राऊत यांनी महाराष्ट्रातही ‘चंपत राय’ असल्याचे म्हटले. बलात्काराच्या आरोपींना ज्याप्रमाणे क्लीनचिट दिली जाते, त्याचप्रमाणे चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पुण्यात शनिवारी मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस  Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं?

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रशासन आणि सरकारच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटल्यास त्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंत्र्यांच्या विभागीय निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण अधिक मजबूत

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं? Read More »

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा

Manoj Jarange : बावनकुळे यांच्या डोळ्याला पाणी आल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत, मनोज जरांगे यांनी मंत्री सिरसाठ यांच्यावर टीका केली. “तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागून हे सगळं केलं. यापुढे त्या टोळीच्या नादी लागू नका,” असा इशारा त्यांनी दिला. “माझ्या समाजाच्या विरोधात कुणी आलं तर मी सोडत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिरसाठ यांनी

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा Read More »

shiv sena symbol hearing

Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भडकले

Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर नेमका अधिकार कोणाचा, तसेच 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर त्यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करताना पक्षाची घटना, पक्षप्रमुखांचे अधिकार, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक,

Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भडकले Read More »

rubal agarwal

Rubal Agarwal : फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर; खाणमाफियावर कारवाई होणार

Rubal Agarwal : राज्य सरकार आणि महसूल खात्याला चक्क फसवून चोरट्या मार्गाने डोंगर पोखरून वाटेल तेव्हा वाटेल तेवढी माती, मुरूम, खडी अर्थात, बेकायदा गौण खनिज उपसणाऱ्या माफियांना ‘ट्रॅक’ करून त्यांना अद्दल घडवण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.  गौण खनिज माफिया आणि त्यांच्या यंत्रणेवर २४ तास लक्ष ठेवून, कोठून, किती आणि कसे गौण खनिज काढले जाते,

Rubal Agarwal : फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर; खाणमाफियावर कारवाई होणार Read More »

raj thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Raj Thackeray: मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना मोठे उधाण आले. मात्र, या भेटीचा राजकारणाशी थेट संबंध नसल्याचे राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केले. मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, शहराचे नियोजन आणि वाढत्या पुनर्विकासामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण Read More »

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद? छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांची भेट झाली असेल, ते आम्हालाही अधूनमधून भेटतात; मात्र त्यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा

Chhagan Bhujbal : प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद? छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार Read More »