Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे.
तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे.
पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील.
सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आला
एसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत.
सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?