DNA मराठी

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

“मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे.

याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *