Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे.
काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.