DNA मराठी

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर

या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे.

या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *