DNA मराठी

खरचं का? ‘या’ अभिनेत्रीमुळे सैफ अली खान – करीना कपूरमध्ये वाद, अनेक चर्चांना उधाण

Saif Ali Khan Remove Kareena Kapoor Name Tattoo: नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारे बॉलिवूड  कपल सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्या येत आहेत. 

सैफच्या हातातून करीना कपूरच्या नावाचा टॅटू काढल्यावर ही बातमी समोर आली. याआधी सैफची पत्नी करीनाचे नाव त्याच्या हातावर लिहिलेले होते आणि आता त्याच्या हातावर महादेवचा त्रिशूळ दिसत आहे. आता हे सर्व प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे घडल्याचे वृत्त आहे. ती अभिनेत्री करीना कपूरला अजिबात आवडत नाही, पण ती सैफच्या खूप जवळ आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. सैफ मुस्लिम आहे आणि करीना हिंदू आहे. त्यांच्या प्रेमात धर्म कधीच दुरावा बनला नाही, पण या अभिनेत्रीने दोन स्टार्सच्या नात्यात दरी निर्माण केली आहे. ती दुसरी कोणी नसून प्रीती झिंटा आहे. सैफचा टॅटू काढल्यानंतर प्रिती झिंटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सांगितले होते की तिला करीना कपूर आवडत नाही. प्रीती अजूनही सैफची खूप चांगली मैत्रीण आहे. करीना कपूरला तो आवडत नाही तरीही सैफ प्रितीसोबत चांगले संबंध ठेवतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *