IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती

img 20260826 wa0004

IPS Vaibhav Gaikwad : महाराष्ट्रातील धडाडीचे अधिकारी म्हणून IAS तुकाराम मुंडे यांची कार्यशैली चर्चेत असताना, अहिल्यानगरच्या मातीतून भारतीय पोलीस सेवेत गेलेल्या एका अधिकाऱ्याने तेलंगणात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले 2018 बॅचचे IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड सध्या हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून जबाबदारी सांभाळत असून संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध धंदे आणि अन्नभेसळीविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सुरू आहे.

तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर गायकवाड यांच्या सेवेला नालगोंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर वरंगळ येथे Assistant Superintendent of Police म्हणून त्यांनी काम पाहिले. याच ठिकाणी Additional DCP Administration आणि Task Force अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. पुढे पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल जिल्ह्यांचे Superintendent of Police म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विविध ठिकाणी काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांनी मिळवला. डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद शहराच्या Task Forceचे नेतृत्व करत आहेत.

हैदराबादमधील Task Forceकडे संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. संवेदनशील धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही हे पथक महत्त्वाची भूमिका बजावते.

अन्नभेसळीविरोधात H-FASTची धडक मोहीम

गायकवाड यांच्या कार्यकाळातील लक्षवेधी उपक्रमांपैकी एक म्हणजे H-FAST — Hyderabad Food Adulteration Surveillance Team. मार्च 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अन्नभेसळीविरोधात पोलिस आणि अन्नसुरक्षा यंत्रणेचा समन्वय साधत कारवाई केली जात आहे.

गुप्त माहिती, नागरिकांच्या तक्रारी आणि क्षेत्रीय माहितीच्या आधारे संशयित ठिकाणे शोधून Food Safety Officers आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त छापे टाकले जात आहेत. नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचा स्रोत शोधणे आणि संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यावर भर दिला जात आहे.

मार्च 2026 पासून आतापर्यंत 208 गुन्हे दाखल, तर 232 प्रकरणे Food Safety Officersकडे सोपविण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो, म्हणजेच सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने आणि Ginger-Garlic Paste यांसह विविध खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे.

तपासात काही ठिकाणी Synthetic Colours, Fabric Dye Colours, Palm Oil, Vanaspati, Starch आणि इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे H-FASTची कारवाई केवळ दुकानदारांपुरती मर्यादित न राहता भेसळीच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

अमली पदार्थांविरोधातही मोठी कारवाई

हैदराबाद City Narcotics Wingची जबाबदारीही वैभव गायकवाड यांच्याकडे आहे. मागील आठ महिन्यांत या विभागाने अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

एका मोठ्या कारवाईत सुमारे 3 कोटी रुपयांचे Hash Oil जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या महत्त्वपूर्ण तपासात झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. Speed Postच्या माध्यमातून देशातील सुमारे 22 राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले. मुंबईत लोकल ट्रेनच्या माध्यमातून गांजाची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याचाही पर्दाफाश झाला. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपयांचे ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आले.

अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 35 विदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले असून त्यांच्या भारतातील पुनःप्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

‘Supply’सोबत ‘Demand’वरही लक्ष

नार्कोटिक्सविरोधातील मोहीम केवळ तस्करांना पकडण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. सरकारी रुग्णालयांमधील De-addiction Centresच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनासाठी पाठविले जात आहे.

हैदराबाद शहरात अलीकडच्या काळात सुमारे 2 हजार व्यक्तींची Drug Testing करण्यात आली. त्यापैकी सुमारे 800 जण Drug Positive आढळले असून त्यांना पुढील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करण्यात आले. विशेष म्हणजे या गटात केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचाच समावेश नसून Street Crimeमध्ये सहभागी व्यक्तींपासून ते IT आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित व्यक्तींपर्यंत विविध स्तरांतील नागरिक आढळून आले.

त्यामुळे अमली पदार्थांविरोधातील लढ्यात Supply आणि Demand या दोन्ही बाजूंवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जात आहे. तस्करीची साखळी तोडण्यासोबतच व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अहिल्यानगरच्या भूमिपुत्राची तेलंगणात ठसा उमटवणारी कामगिरी

पिंपळगाव माळवीसारख्या ग्रामीण भागातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Task Force, Narcotics Wing आणि H-FASTसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून कठोर कारवाईसोबतच intelligence-based policing, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर त्यांनी भर दिला आहे.

अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवाईमुळे हैदराबादमध्ये कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी तेलंगणात कर्तव्य बजावत असताना आपल्या कामगिरीने अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *