DNA मराठी

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Photo

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा

Maratha Reservation: गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सूरू केला आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.  यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.   या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.  सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे.

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा Read More »

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच …..

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता शिंदे सरकारला सर्व बाजूंनी घेरले जात आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ओबीसी नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते भुजबळ यांनीच याचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी दोन महिने अगोदर शिंदे सरकारचा राजीनामा दिल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. पण जेव्हा लोक मला बडतर्फ करण्याविषयी बोलत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो की, मी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक माहिती देऊ शकतात. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोलीत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील, असं फडणवीस म्हणाले. आज मी एवढेच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.  भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  भुजबळांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ म्हणाले, 360 कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. डेटाशी छेडछाड केली जात आहे. बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण संपेल. मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण खोटे आहे. राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलू नका असे सांगितले होते. यावर भुजबळ म्हणाले, “मी यावर गप्प राहिलो, मात्र ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा, असे काही लोक म्हणत आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.”

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ….. Read More »

Maratha Reservation

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान

Ahmednagar News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता राज्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे.  यातच शनिवारी राज्य सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ( अजित पवार गट) छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील ओबीसी एल्गार सभेत नाभिक बांधवांना मराठा समाजावर बहिष्काराचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाला आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उत्तर देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे आरोप केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून अनाजी पंताच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.  अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मात्र ते छगन भुजबळ यांना चालतात. केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच भुजबळ यांचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून म्हणण्यात आलं आहे. राजीनामा राज्यपालांकडे द्या तर या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत देखील टीका करण्यात आली आहे. भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दलचे केलेले वक्तव्य संभ्रम निर्माण करत आहे त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता मात्र अद्याप देखील ते त्याबद्दल सविस्तर बोलायला तयार नाहीत.  तर दुसरीकडे ते सरकारी गाडी, सरकारी सुविधा आणि मंत्र्यांसाठी सगळ्या असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत. यामुळे त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान Read More »

Maratha Reservation 1

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »

Manoj Jarange Patil Photo

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »

Maratha Reservation 1

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे.  पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे.   समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळी तोडगा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिष्टमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.  ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »

IMG 20240109 WA0013

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.  मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.   या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Maratha Reservation

Maratha Reservation : …. तर मराठे अयोध्येला जाणार, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगे यांचं मोठे वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण करणार आहे मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास ते नक्कीच अयोध्येला जातील. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा उत्सव करणार. जालन्यातील अंतरवली गावात पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मराठ्यांना ओबीसीमध्ये तातडीने आरक्षण देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडे केली आहे. 20 जानेवारीपर्यंत राज्य सरकारसाठी चर्चेचे दरवाजे खुले असून मध्यंतरी बाहेर पडलो तर सरकारसाठी चर्चेचे दरवाजे बंद केले जातील, त्यानंतर कोणतीही चर्चा होणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी दिला. मराठा आंदोलनात अडचण निर्माण होईल असे कोणीही करू नये, त्यांनी शांततेने आंदोलन करावे, असेही ते म्हणाले. सरकारने आम्हाला रोखले तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबईतील त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या दारात धरणे आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, आता मराठा कुळातील असल्याचे पुरावे ट्रकभर सापडले आहेत, मग आरक्षण द्यायला काय हरकत आहे? मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? महाराष्ट्रातील मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. गेल्या महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसांचे बेमुदत उपोषण संपवले. तेव्हा राज्य सरकारने दोन महिन्यात समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र, योग्य ती पावले न उचलल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. दोन महिन्यांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले होते.

Maratha Reservation : …. तर मराठे अयोध्येला जाणार, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगे यांचं मोठे वक्तव्य Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. या पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे राहण्याची सोय अहमदनगर शहरातील आलमगीर परिसरामध्ये असणाऱ्या दारूर उमुल मदरासाच्या जमिनीवर तसेच कृषी बाजार समिती येथे करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.  या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार असल्याची माहिती देखील संघटने करून देण्यात आली आहे.  ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे    जाणार आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील Read More »