Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.
या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.