Dnamarathi.com

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे.

आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे. 

तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. 

ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *