DNA मराठी

Manoj Jarange Patil

IMG 20250126 WA0005

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »

IMG 20241019 WA0013

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Manoj Jarange Patil Photo

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

IMG 20240918 WA0004

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Manoj Jarange

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने राज्यभरात मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. मनोज जरांगे बॅकफूटवर? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अपशब्द वापरले. यानंतर त्यांचे सहकारी मंचावर आले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अंतरवली सराईत पत्रकारांशी बोलत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्याला भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि लगेच निघाले.  नंतर रात्री जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करून सकाळी पुन्हा मुंबईला जाण्याचा बेत होता, मात्र प्रशासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे मनोज जरांगे यांनी आपला निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत परतले आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांना परत येण्याची विनंती केली आहे. अंबड तालुक्यात हिंसाचार जालना – घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सोमवारी सकाळी आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याचा आरोप आहे. बस अंबडहून रामसगावकडे जात होती. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस थांबवून तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात संचारबंदी लागू कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, प्रसारमाध्यमे आणि रुग्णालये यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. एसटी बससेवा बंद मनोज जरांगे यांच्या हालचाली पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. इंटरनेट डाऊन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढला.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू Read More »

IMG 20240216 WA0003

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »

Eknath Shinde

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Maratha Reservation :  10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. आज या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.  राज्य सरकारने गेल्या महिन्यात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत नव्याने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वृत्तानुसार, मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन द्यावे लागले. मात्र नंतर त्यांनी सलाईन काढून आरक्षण लागू होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.  गावकरी आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वारंवार सांगण्यावरून त्यांनी थोडे पाणी प्यायले. दरम्यान, उपोषणस्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा सातवा दिवस आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे. अशक्तपणामुळे त्याला चक्कर येत आहे. अन्न, पाणी आणि औषधही घेण्यास नकार देणाऱ्या पाटील यांना तातडीने उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मराठा आंदोलक त्यांना सतत पाणी पिण्याचा आग्रह करत आहेत.   PM मोदींचा कार्यक्रम थांबवणार – जरांगे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून काल त्यांना पाणी देण्यात आले. यामुळे ते संतप्त झाले आणि म्हणाले, “ज्यांनी मला झोपेत पाणी दिले तेच आता मराठा आरक्षण लागू करण्याची जबाबदारी घेत आहेत.” सरकार गप्प बसू शकत नाही आणि असे मानू शकत नाही की माझेच लोक या मार्गाने माझा मृत्यू रोखतील. जर सरकारने दोन दिवसांत कारवाई केली नाही तर मी पुन्हा मुंबईत उपोषण सुरू करेन. याआधी जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच इशारा दिला होता की, जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पीएम मोदींची एकही रॅली महाराष्ट्रात होऊ दिली जाणार नाही. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या प्रारुप अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. हायकोर्टात सरकार काय म्हणाले? दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन पात्र मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. मराठा समाजाला ओबीसी गटांतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसण्याची गेल्या वर्षभरात ही चौथी वेळ आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल Read More »