Dnamarathi.com

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे. 

पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे. 

 समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळी तोडगा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही.

सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला

सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या शिष्टमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *