DNA मराठी

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.

 मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.

 संपूर्ण वेळापत्रक

मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.

 दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा)

21 जानेवारी

मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  

तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल.

22 जानेवारी

बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  

 दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे)

23 जानेवारी

रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  

 दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे)

24 जानेवारी

चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. 

तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा)

25 जानेवारी

 लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)

 26 जानेवारी

वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.