Dnamarathi.com

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता शिंदे सरकारला सर्व बाजूंनी घेरले जात आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ओबीसी नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते भुजबळ यांनीच याचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

16 नोव्हेंबर 2023 रोजी दोन महिने अगोदर शिंदे सरकारचा राजीनामा दिल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. पण जेव्हा लोक मला बडतर्फ करण्याविषयी बोलत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो की, मी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे.

त्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक माहिती देऊ शकतात. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोलीत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.

भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील, असं फडणवीस म्हणाले. आज मी एवढेच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.  भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

भुजबळांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ म्हणाले, 360 कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. डेटाशी छेडछाड केली जात आहे. बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण संपेल. मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण खोटे आहे.

राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलू नका असे सांगितले होते. यावर भुजबळ म्हणाले, “मी यावर गप्प राहिलो, मात्र ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा, असे काही लोक म्हणत आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *