DNA मराठी

Manoj Jarange Patil

manoj jarange

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली. हे आपले निर्णायक आणि शेवटचे आमरण उपोषण असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उद्यापासून बोलणे शक्य होणार नाही, त्यामुळे आजच समाजाशी संवाद साधत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल व्हावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रांची मागणी शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली. गावागावातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, पण तो स्वीकारण्यात आलेला नाही, अशांनीही अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशांनीही आपापल्या नोंदी घेऊन अंतरवाली सराटीत यावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. संबंधितांकडून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कुणबी प्रमाणपत्र पुरेसे नाही, जात वैधता कशी देणार?’ केवळ कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जात वैधता प्रमाणपत्र कसे दिले जाणार? याची स्पष्ट माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या जात वैधतेचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि पात्र असलेल्या सर्व प्रकरणांची वैधता करावी, अशी त्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करावी आणि त्यानंतर जात वैधता कशी केली जाणार, याची स्पष्ट कार्यपद्धती सरकारने जाहीर करावी, असे ते म्हणाले. ‘फक्त प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन मान्य नाही त्याच्या वैधतेबाबतही स्पष्ट अंमलबजावणी हवी,’ असा इशारा त्यांनी दिला. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थांच्या जीआरची मागणी सातारा संस्था, कोल्हापूर संस्था आणि औंध संस्थांबाबतचे जीआर तातडीने काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी जात वैधता कशी केली जाणार, हेही सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. केवळ जीआर काढून पुन्हा समाजाची फसवणूक करू नये. यापूर्वी मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ‘करू, करू’ म्हणता म्हणता 75 वर्षे गेली, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. ‘सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवू नका’ मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘आपला पक्ष, आपला नेता कोणीही नाही; या जगात फक्त जात आपली आहे,’ असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. ही शेवटची फाईट असून गाफील राहू नका, दगाफटका होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी समाजाला दिला. ‘मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार’ मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने धावून यावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘सगळ्यांनी बाहेर पडा, मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. सलग तीन वर्षे मुलांच्या भविष्यासाठी लढत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण जसे धावून जातो, तसेच अंतरवाली सराटीकडे धावून या, असेही त्यांनी म्हटले. SEBC-EWS मधील नियुक्त्यांवरही ठाम भूमिका SEBC आणि EWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच महामंडळाचे सर्व परतावे देण्याची मागणीही त्यांनी केली. एकूणच, कुणबी प्रमाणपत्रांसोबत जात वैधता, सातारा-कोल्हापूर-औंध संस्थांचे जीआर, SEBC-EWS मधील नियुक्त्या आणि महामंडळाच्या परताव्यांसह विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण निर्णायक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा

Manoj Jarange : बावनकुळे यांच्या डोळ्याला पाणी आल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत, मनोज जरांगे यांनी मंत्री सिरसाठ यांच्यावर टीका केली. “तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागून हे सगळं केलं. यापुढे त्या टोळीच्या नादी लागू नका,” असा इशारा त्यांनी दिला. “माझ्या समाजाच्या विरोधात कुणी आलं तर मी सोडत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिरसाठ यांनी केलेली चूक माफ केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आईचा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी वेगळी भूमिका मांडली. “तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. आई ही आई असते. माझ्यावर मराठीचे संस्कार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला माफ करतो मात्र पुढे अशी चूक झाली तर सोडणार नाही,” असं देखील मनोज जरांगे म्हणाले. रद्द करण्यात आलेले प्रमाणपत्र पुन्हा देण्याची मागणीही त्यांनी केली. “28 ऑगस्टच्या आत तुम्ही केलेली चूक दुरुस्त करा. रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा द्या, अन्यथा सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “तुम्ही आमच्या मागे लागलात म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो,” असे म्हणत त्यांनी यापुढे वैयक्तिक व्यंग किंवा टीका करणार नसल्याचे सांगितले. मात्र, संबंधितांनी केलेली चूक सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली. या वक्तव्यामुळे बावनकुळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधितांकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार? जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. नेमकी मागणी काय? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

img 20260624 wa0000

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा  मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मंत्री मंडळातील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माहीती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार,मदत व पुनर्वसन मकरंद जाधव,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी. स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत  घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवड्याला राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने ५ जून २०२६ रोजीच्या काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, याची सविस्तर आकडेवारी संबंधित विभागाने पुढील बैठकीत अनिवार्यपणे सादर करावी, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक आता नियमितपणे घेतली जाणार आहे. चालू अधिवेशन कालावधी संपल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर या उपसमितीची बैठक घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र ‘मराठा कक्ष’ तात्काळ कार्यरत करण्यात यावा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय Read More »

gangadhar kalkute

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल

Gangadhar Kalkute : बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कुणबी दाखल्यांच्या मुद्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुणबी दाखले रद्द करण्याची आणि कथित चुकीचे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. यावर आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करत, त्यांना “मराठा द्वेषाची कावीळ झाली असून मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,” असा घणाघात केला. तसेच बीडमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्लाही त्यांनी हाके यांना दिला. मराठा समाजाविरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याचा आरोप करत काळकुटे यांनी हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यासोबतच, कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर मराठा समाज संविधानिक आणि रस्त्यावरची दोन्ही प्रकारची लढाई लढण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा-ओबीसी वाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विखे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे जरांगे यांनी म्हटले. “मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला असून, तो पाळलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जालना येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.“सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “आतापर्यंत आंदोलन करून ८५० पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, “ते शब्दापासून बदलले तरी मी बदलणार नाही,” असे जरांगे म्हणाले. राहिलेल्या गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आरक्षण मिळवणारच आणि उर्वरित गुन्हेही मागे घ्यायला लावणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षण उपसमितीवरही त्यांनी टीका करत, समाजाला अवमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. उपसमिती बरखास्त करण्याची मागणी करत, “मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देणे ही समितीची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.याशिवाय, कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार Read More »

Manoj Jarange Patil

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले

Manoj Jarange Patil: केंद्र सरकारने आज संपूर्ण देशभरात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती, मात्र केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर घेऊ द्या, कारण इंग्रजी जनगणना केली होती त्या नंतर जनगणना झाली नाहीच. या जनगणनेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळेल, ओबीसीने जातीचे आरक्षण खाल्ले होते ते आता उघडे पडले आहे. कोणी किती खाल्ले ते समजेल. जनगणना करणे आवश्यक नाही, सरकारने बार्टी आयोगाचा शिफारसी जरी मंजूर केल्या, तरी भागते सरकारची इच्छा असेल तर नक्की करा. आमचा काही विरोध करण्याची गरज नाही, मात्र यात निष्पक्ष अधिकारी असले पाहिजे. बळजबरी नोंदी करणारे नसावे जाती वादी अधिकारी नसावे. जनगणना करतान कोणते ही जाती भेध करता कामा नाही, व आता आरक्षणाच कोठा सरकारने वाढवला पाहिजे. आयोग निवडतानी चांगले अधिकारी निवडा. असा सरकारला सल्ला देत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करत होतो.

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले Read More »

IMG 20250129 WA0006

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »