DNA मराठी

Maharashtra

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर एक महिन्यात राज्यात एकून 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड रंजना गवांदे , सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे. “खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे यावे, असे आवाहन अंनिस करत आहे “ -संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस गेल्या एक महिन्यातील दाखल गुन्हे: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2) गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला ) 4) पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे ) 5) मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर ) 6)नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे ) 7) ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई ) 8) अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई) 9) रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई ) 10) गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर ) 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14 ) महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल Read More »

1st may

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही….

May 1 Rule Changes : उद्यापासून १ मे २०२६ पासून सामान्य नागरिकाचे वित्त, बँकिंग आणि गुंतवणुकीवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीसोबतच, बँक खाती, विमा योजना, क्रेडिट कार्ड्स, ऑनलाइन गेमिंग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर परिणाम करणारे बदल लागू होण्याची शक्यता आहे. चला तर मग, १ मे पासून नक्की कोणते नियम बदलणार आहेत, यावर एक नजर टाकूया. ऑनलाइन गेमिंगसाठी अधिक कडक नियम: १ मे पासून, ऑनलाइन गेमिंग उद्योग एका नवीन नियामक चौकटीअंतर्गत कार्यरत होईल. केंद्र सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (Online Gaming Authority of India) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ‘ऑनलाइन गेमिंग नियमन कायदा-२०२५’ (Online Gaming Regulation Act-2025) अंतर्गत, गेमिंग कंपन्यांना आता मानकांच्या एका नवीन संचाचे पालन करणे अनिवार्य असेल. या संदर्भात एक दिलासादायक बाब म्हणजे, गेम प्रमाणपत्राचा (Game Certification) वैधता कालावधी ५ वर्षांवरून वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे. PMJJBY आणि PMSBY चे हप्ते (Premiums) वजा होणार ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) यांचे वार्षिक हप्ते (Premiums) मे महिन्यात बँक खात्यातून आपोआप वजा (Auto-debit) केले जाणार आहेत. बँक खात्यांमधून अनुक्रमे ४३६ आणि २० इतकी रक्कम वजा केली जाऊ शकते. ज्या खातेदारांनी या योजनांचे सदस्यत्व घेतले आहे, त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला जातो. एलपीजी सिलिंडर्स महाग होण्याची शक्यता एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतींचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर, १ मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव आणि पुरवठ्याशी संबंधित परिस्थितीमुळे, गॅसच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. SBI कार्ड ग्राहकांना धक्का SBI कार्ड १ मे पासून आपल्या ‘विलंब शुल्क’ (Late Payment Fees) दरांमध्ये सुधारणा करणार आहे. आता ग्राहकांना अगदी लहान थकीत रकमेवरही शुल्क भरावे लागू शकते. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफ करण्याच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. e-KYC अद्ययावत करणे अनिवार्य बँक ग्राहकांसाठी त्यांचे e-KYC तपशील अद्ययावत करण्याची अंतिम मुदत १ मे आहे. ज्या खात्यांची KYC माहिती अपूर्ण आहे, अशा खात्यांवरील व्यवहार स्थगित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे, कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकेची शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचे तपशील त्वरित अपडेट करावेत. PF काढण्याबाबत चर्चांना उधाण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत; ज्यानुसार भविष्यात एटीएम (ATM) आणि UPI द्वारे PF ची रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या संदर्भात सरकारकडून किंवा EPFO ​​कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही…. Read More »

img 20260428 wa0002

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय?

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार आणि योगेंद्र पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्नेहभोजनादरम्यान पवार कुटुंब काही महत्वाचे निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकीकडे या स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बाग स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्यामुळे काल रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार देखील उपस्थित होते. आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा होणार का याबाबत देखील सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याने आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय? Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Nilesh Lanke : जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर येथे अलीकडेच सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली शनिदेवाच्या मूर्तीभोवती लोखंडी संरचना उभारण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून, याबाबत खासदार नीलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार लंके यांनी शनिवारी मध्यरात्री मंदिराला भेट दिली असता, पारंपरिक स्वरूपात उघड्यावर असलेली शनिदेवाची शिळा लोखंडी दरवाज्यांमधून बंदिस्त केल्याचे आढळले. शिंगणापूर हे “देव आहे पण देऊळ नाही, घरं आहेत पण दरवाजे नाहीत” या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे देश-विदेशात ओळखले जाते. अशा ठिकाणी श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवतेला बंदिस्त करणे ही भाविकांच्या भावना दुखावणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात मंदिर प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही, दर्शन व्यवस्थापन यांसारखे उपाय स्वीकारार्ह असले तरी, परंपरेला धक्का पोहोचवणारे बदल टाळावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शिंगणापूरची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि धार्मिक अस्मिता अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना स्थानिक भाविक व परंपरा यांचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच अधिकृत पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची माहितीही खासदार लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Dhirendra Shastri :  सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो…रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar on Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे, सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून या भोंदूला पाठीशी घालण्याचं कारण काय ? महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा भोंदू धीरेंद्र शास्त्री या मोठ्या पक्षाला मोठा वाटतो का ? हा मोठा पक्षच या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो, अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महामानवांची भूमी आहे, इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरजच काय ? नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का ? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. पुढे रामदास स्वामींनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरू’ असं सांगत पुन्हा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असं ते म्हणाले.

Rohit Pawar on Dhirendra Shastri :  सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो…रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »