DNA मराठी

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय?

img 20260428 wa0002

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार आणि योगेंद्र पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्नेहभोजनादरम्यान पवार कुटुंब काही महत्वाचे निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे एकीकडे या स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बाग स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्यामुळे काल रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार देखील उपस्थित होते.

आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा होणार का याबाबत देखील सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याने आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *