maharashtra news

img 20260826 wa0004

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती

IPS Vaibhav Gaikwad : महाराष्ट्रातील धडाडीचे अधिकारी म्हणून IAS तुकाराम मुंडे यांची कार्यशैली चर्चेत असताना, अहिल्यानगरच्या मातीतून भारतीय पोलीस सेवेत गेलेल्या एका अधिकाऱ्याने तेलंगणात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले 2018 बॅचचे IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड सध्या हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून जबाबदारी सांभाळत असून संघटित गुन्हेगारी, अमली […]

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती Read More »

sugar

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता?

Sugar Prices: साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊ लागला आहे. चहा, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढीची झळ थेट ग्राहकांना बसत आहे. अशा परिस्थितीत ऊसाशिवाय इतर कोणत्या स्रोतांपासून साखर किंवा गोड पदार्थ तयार होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधले जात आहे. ऊस हा जगातील साखरेचा प्रमुख स्रोत असला, तरी

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता? Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

Rupali Chakankar : सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश Read More »

sunil tingre

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

Sunil Tingre : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष असले, तरी पुणे महापालिकेतील राजकारणात दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासनिधी देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादीच्या

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार

Nilesh Lanke : सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आपली भूमिका आहे. राजकारणात स्पर्धा करायची असेल तर ती विकासाची करा; विरोधकांना अडचणीत आणणे, पोलिसांवर दबाव आणणे

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार Read More »

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

Onion Price : आधी साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असताना आता कांद्याच्या वाढत्या किमतीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत दर जवळपास दुप्पट झाले आहेत. या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याचा निर्णय

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

cheque book

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक

Cheque Book : चेकचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चेकबुकच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. 1 जानेवारी 2027 पासून अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकबुकचा वापर महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी आपल्या बँकेकडून नवीन चेकबुक घेण्याची तयारी करावी. काही बँकांनी यासंदर्भात ग्राहकांना सूचना देण्यास सुरुवात

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक Read More »

mitchell starc

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार

Mitchell Starc : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने धुमाकूळ घातला. मॅके येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्टार्कने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत आटोपला. पहिल्याच चेंडूवर विकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार Read More »

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »