DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20240111 WA0012

Ahmednagar News: राधाकृष्ण विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये; विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण!

Ahmednagar News: महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेवून देहरे येथे महामंडळाच्या बस  थांबविण्यासाठी परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून  उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला. देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांच्या समस्येच गांभार्य लक्षात घेवून विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लाॅन्समध्ये येण्यास सांगितले. युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली.विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थाबतील आशा पध्दतीची कार्यवाही उद्या पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagar News: राधाकृष्ण विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये; विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण! Read More »

Uddhav And Shinde

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय

Maharashtra Politics :  शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. शिवसेनेच्या एकाही सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही असे ते म्हणाले. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 39 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय सोपवला होता.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय Read More »

BJP

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Shinde And Thackeray 1

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

IMG 20240109 WA0020

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Kotwali Police

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Crime 1

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार

Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी  रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.  मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.  काय आहे प्रकरण गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.  तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली. तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.  आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार Read More »

IMG 20240106 WA0000

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Election

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »

Screenshot 2024 01 04 15 17 10 53 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी

Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामवर केलेल्या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.  त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडावर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे देखील म्हटले आहे.  याच बरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असं म्हंटले होते. मात्र हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी Read More »