Dnamarathi.com

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे. 

या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती. 

 मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.

 यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे.

तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.  

भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *