Dnamarathi.com

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.

 या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.

तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *