Dnamarathi.com

Ahmednagar News: महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेवून देहरे येथे महामंडळाच्या बस  थांबविण्यासाठी परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून  उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला.

देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

विद्यार्थ्यांच्या समस्येच गांभार्य लक्षात घेवून विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लाॅन्समध्ये येण्यास सांगितले. युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली.विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थाबतील आशा पध्दतीची कार्यवाही उद्या पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *