Dnamarathi.com

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे.

दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.

 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे. 

आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *