Dnamarathi.com

Maharashtra Politics :  शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. शिवसेनेच्या एकाही सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही असे ते म्हणाले.

दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 39 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यानंतर शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय सोपवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *