DNA मराठी

DNA Marathi News

Manoj Bharathiraja

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन.

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा हे प्रख्यात तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे. अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदानमनोज भारतीराजा यांनी 1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पदार्पण केले होते. 2013 मध्ये त्यांनी ‘मार्गजी थिंगल’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले. माहितीनुसार मनोज भारतीराजा यांना काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मनोज भारतीराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “त्यांनी ‘ताजमहल’, ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शनही केले. मी दिग्दर्शक भारतीराजा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.” मनोज भारतीराजा यांच्या पश्चात त्यांची पत्नी नंदना आणि दोन मुली अर्शिता आणि मथिवाधानी असा परिवार आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मनोज आता आपल्यात नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्यांचे अकाली निधन दुःखद आहे. ते फक्त 48 वर्षांचे होते. देव त्यांचे वडील थिरु भारतीराजा आणि त्यांच्या कुटुंबाला या असह्य वेदनादायक नुकसानातून सावरण्याची शक्ती देवो.”

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन. Read More »

IMG 20250326 WA0012 1024x682

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

Snehal Jagtap: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत आज महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदा म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले. तसेच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश… Read More »

Screenshot 2025 03 26 19 34 38 63 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय?

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात मंगळवारी एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील शेतकरी नेता ईश्वर शिंदे या तरुणाने विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तर दुसरीकडे प्रशासन आणि आमदारांनी त्याला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडावर जाऊन ईश्वर शिंदेची मनधरणी केली आणि त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले. आंदोलनाची पार्श्वभूमी ईश्वर शिंदे हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, ते शेतकरी नेता म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनादरम्यान हातात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर झळकावले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना त्यांनी विधानभवन परिसरात झाडावर चढून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्रेनने झाडावर चढले आमदार अग्रवालईश्वर शिंदे यांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी सुरुवातीला प्रयत्न केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडाच्या दिशेनेवर जाऊन ईश्वर शिंदे यांच्याशी संवाद साधला. सुमारे अर्ध्या तासाच्या मनधरणीनंतर शिंदे खाली उतरण्यास तयार झाले आणि त्यांना सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात आले. घटनास्थळावरील गोंधळया आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बघ्यांची गर्दी आणि माध्यमांचे कॅमेरे यामुळे प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. ईश्वर शिंदे यांना खाली उतरवल्यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. शेतकरी मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेतईश्वर शिंदे यांच्या या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे. त्यांनी आपल्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर वापरल्याने या आंदोलनाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आमदार अग्रवालांचे कौतुकआमदार अनुप अग्रवाल यांनी संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “आंदोलकाला खाली उतरवणे हे आमचे प्रथम कर्तव्य होते. त्याच्या मागण्या काय आहेत, हे समजून घेऊन त्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे,” असे अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घटनेनंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. ईश्वर शिंदे यांच्या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय? Read More »

Ajit Pawar

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार

Ajit Pawar: ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या अण्णा बनसोडे यांनी आज विधानसभा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, ही जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या 22 व्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जेव्हा कोणी सभागृहाच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी निवडून येतो, तेव्हा तो एका पक्षाचा नसतो, तर संपूर्ण सभागृहाचा होतो. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, कामकाज निष्पक्षपणे चालवणे, ही मोठी जबाबदारी असते. मला विश्वास आहे की अण्णा बनसोडे ही जबाबदारी यशस्वीपणे निभावतील. पिंपरी-चिंचवड सारख्या उद्योगनगरीत स्थलांतरित कामगारांची मोठी संख्या आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अण्णांनी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मोठे योगदान दिले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. कोरोना संकटाच्या काळात अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून कोरोना लसीकरणासाठी 25 लाख रुपये देण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडच्या ‘वायसीएम’ रुग्णालयासाठी सव्वा कोटी रुपये देऊन आरोग्य सुविधांसाठी मोठा हातभार लावला. त्यांच्या समाजसेवेचा हा वारसा पुढेही सुरू राहील, तसेच उपाध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार Read More »

Rohit Pawar

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळारोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोना काळातील योजनांचा गैरवापरया प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावाया संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात खळबळया आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप Read More »

Yogesh Kadam

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा

Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान भवन आवारात पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “कुणाल कामराचं लोकेशन आम्ही ट्रेस करतोय. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असं कदम यांनी ठणकावून सांगितलं. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटावरही निशाणा साधताना ते म्हणाले, “ठाकरे गटाने कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. राज्यात शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” कुणाल कामरा याने अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. कदम यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, काहींनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कुणाल कामराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व मोठं आहे. व्यंगात्मक टीका ही ठाकरेंची ताकद होती, पण आता त्यांचे कार्यकर्ते असतील तर याकडे दुर्लक्ष करायला हवं. राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये काही बोललं गेलं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की त्यांचं कर्तृत्व छोटं होत नाही. कलाकार काही बोलला म्हणून त्याचं ऑफिस फोडणं चुकीचं आहे.” पवार यांनी पुढे सावधगिरीचा इशारा देताना म्हटलं, “2014, च्या आधीचा काळ आता नाही. एखाद्या नेत्यावर बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. व्यंगात्मक टीकेमुळे एकनाथ शिंदेंची उंची कमी होत नाही.” या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा Read More »

IMG 20250322 WA0000 1024x768

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक Read More »

Jayant Patil

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil: विधानसभेत विरोधी पक्षाच्या 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आधुनिक पद्धतीने शेती करणारे राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे या आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शिवारात कायमच पाण्याची चणचण होती ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभारले होते. ओवर फ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून पाणी सोडावे अशी त्यांची मागणी होती. तसे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरीही मागणी मान्य न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हे अतिशय दुर्दैवी आहे. असं जयंत पाटील म्हणाले. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1883 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहिले त्याकाळी फुलेंनी मांडलेल्या समस्या आजही कायम आहेत कारण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यकर्ते कमी पडत आहेत. सातत्याने तोट्याची शेती आणि त्यातून होणारी आर्थिक कुचंबना हे आत्महत्यांचे मूळ कारण आहे. मागच्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात सुमारे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. योग्य सिंचन व्यवस्था नाही, वीज पुरवठा नाही, जीएसटीचा अतिरिक्त भार त्यात सावकारी बेहिशोबी कर्जाचा पाश यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सत्ता आल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांना न्याय अद्याप मिळालेला नाही. असेही जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मुंबई घडवली त्यांना मुंबईत राहण्याची भ्रांती करावी लागते. कारण त्यांच्या घरांवर परप्रांतीयांचा डोळा आहे. मुंबईत 200-300 अमराठी विकासक आहेत. त्या तुलनेत मराठी विकासक फार कमी आहे. हे परप्रांतीय विकासक सहाव्या मजल्यावर बसूऊ मुंबईतील इंच न इंच जमिनीची सौदेबाजी करतात. काही एस आर ए प्रकल्प 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची गैरसोय झाली आहे. विकासकांनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जाणून-बुजून प्रकल्प प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकांवर कारवाई का होत नाही? त्यांच्यावर फौजदारी होणे दाखल होणे गरजेचे आहे. काळा चौकीत राहणाऱ्या प्रणय बोडके या युवकाला चुकीच्या मार्गाने येणाऱ्या शिवशाही बसने चिरडले, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्याच्या पत्नीच्या पदरी दीड वर्षाचे मूल आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई झालीच पाहिजे. भारताला मोठ्या ऐतिहासिक परंपरा आहे. तंत्रज्ञानाचा वारसा आहे. आपली अवस्था वाईट का झाली? तर आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही, विज्ञान चमत्काराला जोडलं, देवाकडून दैवाकडे गेलो, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे पारडे जड झाले. कर्मकांडांना महत्व दिलं. जातिभेद सोबतीला घेतले. यामुळे समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमणांनी आपल्यावर सत्ता गाजवली. स्वातंत्र्यानंतर गोष्टी बदलल्या. मात्र आता जग तिथे अवकाशात पोहोचलेलं असताना आपण इथे कबरीच्या मागे लागलो आहेत. हे दुर्दैव आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल Read More »

Maharashtra Government

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Government: राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ Read More »

MP Sujay Vikhe

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe: अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यानंतर ते लगेच कोर्टाच्या बाहेर पडतात, ज्यामुळे कायद्यातील वयाची अट कमी करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास 50 टक्के आरोपी अल्पवयीन असतात. 16 किंवा 17 वर्षाचा मुलगा खूनासारखा गंभीर गुन्हा करूनही कायद्याच्या वयाच्या अटींमुळे सुटतो. या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सुरक्षिततेची भावना खालावत आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे कायद्यातील वयाची अट. सध्याच्या कायद्यानुसार, 18 वर्षाखालील मुलांना अल्पवयीन मानले जाते आणि त्यांच्यावर सामान्य कायद्याची कारवाई लागू होत नाही. यामुळे अनेकदा अल्पवयीन गुन्हेगारांना शिक्षा न मिळाल्याने ते पुन्हा गुन्हा करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण देऊन त्यांना गुन्ह्याकडे वळण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तसेच, कायद्यातील वयाची अट कमी करून अल्पवयीन गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाली पाहिजे.

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »