Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता.
या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता.
आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.