DNA मराठी

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

IMG 20250326 WA0012 1024x682

Snehal Jagtap: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत आज महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदा म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली.

कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले. तसेच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *