Shevgao Police: पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, यादव बेकरी समोर (वरवट बकाल रोड) रात्रीच्या सुमारास तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळ पर्यंत हि कारवाई सुरु होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री २२:१० वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे (अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला.
यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला: ५० पोते, मस्तानी तंबाखू ११ पोते, नजर १००० पानमसाला व N-05 प्रीमियम तंबाखू: एकूण ५० पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रूक असा एकूण जप्त मुद्देमाल: ७०,१३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकला अटक करण्यात आली.तर M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (पांढुर्णा, छिंदवाडा, म.प्र.) चे मालक/भागीदार संचालक.या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






