Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे.
2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात.
अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे.
येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.