Prajakt Tanpure : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण माजी राज्यमंत्री राहिलेले व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहिलेले प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी माघार घेतली होती व फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला होता अखेर भाजपकडून तनपुरे यांच्या त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी खात्रीशीर माहिती समजते आहे
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाली यावेळी कडीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर प्राजक्त तनपुरे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत तनपुरे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना फोन केला व तनपुरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेतली व अक्षय कर्डिले आमदार झाले
दरम्यान निवडणुकीतून माघार घेतलेले तनपुरे यांची आगामी काळातील भूमिका काय असणार तसेच ते भाजप प्रवेश करणार का मुख्यमंत्री फडणवीस हे तनपुरे यांचे राजकीय पुनर्वसन करणार का असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले दरम्यान नुकतीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली व भाजपकडून अहिल्यानगर च्या जागेवरती दावा करण्यात आला तर भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात येणार यावरती चर्चा रंगलेल्या असतानाच आता थेट तनपुरे यांचे नाव समोर येत आहे यामुळे पोटनिवडणुकीतील त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देत भाजपकडून तनपुरे यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे
नुकतेच तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा मामा असलेले जयंत पाटील यांचा फोटो ठेवल्याने एकच चर्चा सुरू झाली होती. तनपुरे सध्या मुंबईत असून नेमकं त्यांनी भाजपात प्रवेश घेणार का व याबाबतची तारीख अद्याप निश्चित झाली नाही तसेच तनपुरे यांच्या समर्थकांकडून देखील याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेले नाही यामुळे तनपुरे यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.






