DNA मराठी

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई

acb action

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामा व इतर 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता. तपासात मदत करण्यासाठी त्यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी 18 मे 2026 रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *