Dnamarathi.com

Maharashtra News:  महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज असल्याचे प्रतिपादन महायुचीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. महायुतीच्या काळात सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे वेगवान निर्णय घेतले आहेत. देशात महाराष्ट्रला विकासात पुढे ठेवण्याचे काम सुद्धा महायुती सरकार करत आले आहे असेही त्यांनी सांगितले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. 

महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभांना त्यांच्यासोबत जिल्हा बॅंकचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे, कोल्हार, चिंचोडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, डमाळवाळी, डोंगरवाडी गावांसाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार डॉ. विखे पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदाद पवार या तीन खंद्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. गतीमान सरकार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ मोठे प्रकल्प आणून राज्यातील तरूणांना रोजगार दिले, अनेक भागातील पाण्याच्या योजना, लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री, महात्मा फुले आरोग्य योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, आपला दवाखाना योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजना राज्यातील तळागळापर्यंत पोहचविल्या.

राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळवणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या. शेतकऱ्यांसाठी दुष्काळी योजना आणि इतर योजना राबवून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतपप्रधान होणार असणार आहे. यामुळे देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यास राज्याचा विकास अधीक जलद गतीने होणार यात कोणतीही शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, महायुती सरकार हे लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती अधिक गतीने होणार यात कोणतीही शंका नाही. त्यात महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. त्यांना संसदेचा चांगला अनुभव आहे. यामुळे स्थानिक प्रश्न सोडविताना त्यांचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले. 

तर आमदार मोनिका ताई यांनी खासदारांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेल्या कामांची आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीने डॉ. विखे काम करतील या बाबत त्यांनी सविस्तर माहिती मतदारांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *