IPL 2025 : रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल 12 धावांनी पराभव करत विजय नोंदवला आहे.
मुंबईच्या विजयानंतर सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते वेगवेगळे कॉमेंट करताना दिसत आहे.
करुण नायर – बुमराह वाद
दिल्ली कॅपिटल्सकडून करुण नायरने शानदार कामगिरी केली. त्याने 89 धावांची खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ आणले. करुणने जसप्रीत बुमराहच्या षटकात 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या. दरम्यान, बुमराह आणि करुणमध्ये वाद झाला. करुणने बुमराहच्या चेंडूवर दोन धावा घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, पण धाव घेताना दोघांमध्ये टक्कर झाली, जी बुमराहला आवडली नाही.
ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बुमराहने करुणला काहीतरी सांगितले, ज्यावर करुण नायरने प्रत्युत्तर दिले आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. यादरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा बुमराह आणि करुण वाद घालत होते, तेव्हा रोहित शर्माने मान वळवून मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ 19 षटकांत 193 धावांवर सर्वबाद झाला आणि मुंबईला 12 धावांनी सामना जिंकता आला. या विजयासह, सलग दोन पराभवांनंतर मुंबईने हंगामातील पहिला विजय मिळवला. त्याच वेळी, सलग विजयांनंतर दिल्लीला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.
दिल्लीकडून करुण नायरने 89 धावा केल्या तर मुंबईकडून कर्ण शर्माने तीन विकेट्स घेत सामन्याचा मार्ग बदलला. मुंबईने 205 धावा केल्यानंतर, दिल्लीला 206 धावांचा पाठलाग करणे कठीण झाले.