DNA मराठी

Pune ACB : पुणे पोलीस महिला API ला 28 लाखांसह रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ

acb

Pune ACB : पुणे पोलीस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार असे अटक करण्यात आलेल्या या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. पोलिस आयुक्तालयाच्या आवारातच लाच स्वीकारताना त्यांना जेरबंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तोटेवार यांनी 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली. मात्र ही लाच नेमकी कोणासाठी किंवा कोणत्या प्रकरणात घेतली जात होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ACB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती आणि त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. असे असताना त्यांनी लाच स्वीकारल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

दरम्यान, ACB कडून आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *