DNA मराठी

Ahmednagar Crime : अनैतिक संबंध अन् शेवगावात पत्नीने केली पतीची हत्या

Screenshot 2024 10 07 11 16 14 13 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Ahmednagar Crime: शेवगावात अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याचे पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणात कारवाई करत 12 तासाचे आत आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (32 वर्ष) याची विजयपुर गावामधील अनिल ज्ञानदेव जगदाळे व त्याची प्रियसीने हत्या केली होती. 

आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे याने डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहान करुन ज्ञानेश्वरची हत्या केली.

या प्रकरणात मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडिल पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी वरिल दोघांविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं.कलम-103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.  

या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नांगरे  वेगवेगळी दोन पोलीस पथके बिडकीन, पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *