DNA मराठी

Harshvardhan Sapkal : आदिवासी विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा; अन्यथा वर्षा बंगल्याला घेराव घालणार

harshwardhan sapkal

Harshvardhan Sapkal : नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्च काढलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आश्रय घेतला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पोलिसांनी विद्यार्थ्यांचा ससेमिरा सुरू केला आणि काँग्रेसच्या मुख्यालयात बेकायदा प्रवेश करून विद्यार्थीनींना धमकावले ताब्यात घेतले. पोलिसांनी NSUI अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUI अध्यक्षांना अटक केली आहे.

“काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी अशा बेकायदा पद्धतीने प्रवेश करून केलेली कारवाई दंडेलशाहीचे लक्षण आहे. अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची तसेच NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करावी,”

“विद्यार्थ्यांची सुटका केली नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *